Maharashtra News Live Updates: देवेंद्र फडणवीसांच्या बॅगचीही तपासणी झाली; भाजपने व्हिडीओ आणला समोर
Maharashtra News Live Updates : आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

Background
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. मतदानाचा दिवस जसा-जसा जवळ येत आहे, तसा तसा प्रचाराला वेग येत आहे. दरम्यान, आजदेखील राज्यातील प्रमुख नेत्यांच्या राज्यातील वेगवेगळ्या भागांत सभा होणार आहेत. सभांच्या माध्यमातून हे नेतेमंडळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
125 कोटींची उलाढाल प्रकरणी चौकशीसाठी किरीट सोमय्या मालेगावात दाखल
- 125 कोटींची उलाढाल प्रकरणी चौकशीसाठी माजी खा. किरीट सोमय्या मालेगावात दाखल..
- ज्या तरुणांच्या नावाने बँकेत व्यवहार झालेत त्यांच्याशी गाठी भेटी सुरू..
- फिर्याद दिलेल्या मुलांच्या भेटी घेत घेतली माहिती..
- नामको बँकेमध्ये मध्ये देखील घेणार भेट..
- छावणी पोलीस स्टेशन मालेगाव येथे दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात चर्चा करणार..
- व्होट जिहाद साठी हा पैसा वापरला गेल्याचे किरीट सोमय्या यांनी केले होते ट्विट द्वारे आरोप.
आशिष देशमुख यांनी मतदारांसमोर नतमस्तक
सावनेर विधानसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी मतदारांना नतमस्तक होऊन यावेळी परिवर्तन नक्की करा असे आवाहन केले आहे. गुंड, भ्रष्टाचारी, बदमाश लोकांना घरी पाठवा म्हणत सुनील केदार वर टीका केली आहे.




















