एक्स्प्लोर

Uday Samant : गृहखात्याबाबत अमित शाहांशी एकनाथ शिंदे चर्चा करतील, मनसेबाबतही उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य

Uday Samant : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी मनसेच्या युतीबाबत देखील भाष्य केलं.

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरु होत असून नवनिर्वाचित आमदार विधानभवनात पोहोचत आहेत. शिवसेनेचे नेते माजी मंत्री उदय सामंत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.  ते म्हणाले की मंत्रिमंडळाचा विस्तार योग्यवेळी मुख्यमंत्री करतील. तीनही नेते मंत्रिमंडळा बाबत चर्चा करतील. सभापती निवडीसंदर्भात सर्व निर्णय लवकर होतील, असंही ते म्हणाले. 

भाजप आणि मनसेच्या युतीसंदर्भातील देवेंद्र फडणवीस यांच्या युतीसंदर्भात विचारलं असता उदय सामंत यांनी हा त्यांचा निर्णय असू शकतो, असं म्हटलं. देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेशी देखील चर्चा करतील, असं उदय सामंत म्हणाले. मंत्रिपदाचं वाटप कसं होणार हे शिवसेनेच्या बाबतीत एकनाथ शिंदे निर्णय घेतील. महायुतीबाबत तीन नेते एकत्र बसून निर्णय घेतील. 

शेतकरी आत्महत्या होऊ नये म्हणून आम्ही काम करु आणि कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी प्रयत्न करु, असंही सामंत म्हणाले. 

विधानसभेत पहिल्यांदा असा दिवस की कोकणातून एका कुटुंबातून सख्खे भाऊ विधानभवनात आले आहेत. मी आणि माझा मोठा भाऊ विधानसभेत आलो आहे. तसेच तसेच निलेश राणे आणि नितेश राणे देखील विधानसभेत आले आहेत.  आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई याचंही अभिनंदन असं उदय सामंत म्हणाले.  

कोकणातून आम्ही दोन राणे दोन सामंत असे निवडून आलोय. एका घरातले भाऊ निवडून येतात तेव्हा आनंदच होतो, असं उदय सामंत म्हणाले.   

उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकरणाबाबत अधिक भाष्य करणं टाळलं. अजित पवारांना दिलासा मिळाला याबाबत काही माहिती नाही असं सामंत म्हणाले. अजित पवारांबाबत मला माहिती घ्यावी लागेल, असंही ते म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती मविआ नेत्यांना राहील. ते देखील सहकार्य करतील, असं उदय सामंत म्हणाले. मविआ देखील परंपरा जपण्यास सहकार्य करतील, असं उदय सामंत म्हणाले. गृह खात्यासंदर्भात विचारलं असता,कोणत्याही खात्यावरुन ओढाताण सुरु नाही. एकनाथ शिंदे निर्णय घेतील. आम्ही गृह खातं मागितलं, इतर खाती मागितली आहेत, त्याबाबत चर्चा अमित शाह यांच्यासोबत होईल, एकनाथ शिंदे चर्चा करतील. जे काही होईल ते समन्वयानं होईल, असं उदय सामंत म्हणाले.

इतर बातम्या : 

Ajit Pawar: जप्त केलेली अफाट संपत्ती, पुन्हा खिशात? आयकर विभागाने अजित पवारांच्या मालमत्तेवरील जप्ती उठवल्यानंतर अंजली दमानियांचं टीकास्त्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Embed widget