Maharashtra Assembly Election Result : महाराष्ट्राच्या सत्तेची चावी कुणाकडे? महानिकाल कुठे आणि कसा पाहाल?
Maharashtra Assembly Election Result 2024 : पोस्टल मतमोजणीपासून अंतिम निकालापर्यंत आज एबीपी माझावर मॅरेथॉन कव्हरेज करण्यात येणार असून त्याचे प्रत्येक अपडेट्स पाहायला मिळतील.
![Maharashtra Assembly Election Result : महाराष्ट्राच्या सत्तेची चावी कुणाकडे? महानिकाल कुठे आणि कसा पाहाल? Maharashtra Assembly Election Result today mahayuti vs maha vikas aghadi live updates of vidhan sabha elections marathi news Maharashtra Assembly Election Result : महाराष्ट्राच्या सत्तेची चावी कुणाकडे? महानिकाल कुठे आणि कसा पाहाल?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/7a0c2444d5474e12ab4ca83f4f9e1e24173229518000293_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Assembly Election Result 2024 : 23 नोव्हेंबर... गेल्या महिन्याभरापासून या दिवसाची वाट राज्यातला जवळपास प्रत्येक सुजाण नागरिक पाहात होता. महाराष्ट्र या प्रगतीशील, पुरोगामी राज्याची पुढची धुरा कोणाच्या हाती द्यायची याचा फैसला करणारा हा दिवस. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक केवळ राज्यासाठीच नाही तर देशाच्या राजकारणासाठी महत्त्वाची. अशा या महत्त्वाच्या निवडणुकीचा आज निकाल लागतोय. 20 नोव्हेंबरला मतदान झाल्यावर आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होतेय.
ही निवडणूक महाराष्ट्राचे पुढचे कर्तेधर्ते ठरवेलच पण त्याचसोबत देशाच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्याची ताकद आजच्या निकालांत दडलेली आहे. 2019 मध्ये अस्तित्वात आलेल्या विधानसभेने न भूतो न भविष्यती असे बदल, सत्तांतरं अनुभवली. राज्यातले दोन मोठे पक्ष फुटले, समीकरणं कमालीची बदलली. एकेकाळी दोस्तीच्या आणाभाका घेतलेले कट्टर प्रतिस्पर्धी झाले. नात्यांत भाऊबंदकी आली. काका-पुतण्या आमने सामने ठाकले, वडील-मुलगी एकमेकांविरोधात उभे राहिले.
आता मतदारराजा पुन्हा महायुतीला सत्तेवर बसवतो की महाविकास आघाडीला कौल देतो की त्रिशंकू अवस्था येऊन राज्यावर राष्ट्रपती राजवटीची स्थिती ओढवते. भाजप विरूद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरूद्ध शिवसेना अशा रणसंग्रामात कोण बाजी मारणार...अवघ्या काही तासांतच या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.
मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?
संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल, पुढील १० तासांत जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे.. विधानसभेचे वेगवान, अचूक निकाल तुम्हाला सकाळपासूनच एबीपी माझावर पाहता येणार आहेत... प्रत्येक मतदारसंघात कुणी मारली बाजी? कोण होणार तुमचा आमदार? कुणाची येणार सत्ता? काय घडामोडी घडणार? राष्ट्रपती राजवट लागणार का? कोण होणार किंगमेकर? या सर्व प्रश्नांची उत्तर, सविस्तर विश्लेषण.. तुम्हाला 'माझा'वर पाहता येणार आहे.
महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला एबीपी माझा वाहिनीवर आणि एबीपी माझाची वेबसाईट https://marathi.abplive.com/elections वर पाहता येईल. याशिवाय एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतमोजणी आणि निकालाच्या अपडेटस पाहता येईल. एबीपी माझाच्या राज्यभरातील प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहता येतील.
एबीपी माझाच्या वेबसाईटस भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल. https://results.eci.gov.in/ या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि निकालाचे अपडेट पाहू शकता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)