एक्स्प्लोर
Advertisement
Opinion poll : महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेची सत्ता येणार; एबीपी माझा-सी व्होटरच्या सर्व्हेचा अंदाज
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर 24 ऑक्टोबरला अंतिम निकाल स्पष्ट होईल. मात्र त्यापूर्वी एबीपी माझा आणि सी व्होटर यांनी घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये जनमताचा कल समोर आला आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर 24 ऑक्टोबरला अंतिम निकाल स्पष्ट होईल. मात्र त्यापूर्वी एबीपी माझा आणि सी व्होटर यांनी घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये जनमताचा कल समोर आला आहे. त्यानुसार यावेळीदेखील महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता येण्याची शक्यता जास्त आहे.
48.8 टक्के लोकांनी भाजपची सत्ता येईल या बाजूने कल दिला आहे. तर शिवसेनेला 9 टक्के , काँग्रेसला 10.6 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसला 11.3 टक्के, इतर 11.3 टक्के असा कल या सर्व्हेमध्ये देण्यात आला आहे. तर 8.9 टक्के लोकांनी सांगता येत नाही असं सांगितलं आहे.
सर्व्हेमध्ये विचारण्यात आलेले प्रमुख प्रश्न
1. या निवडणुकीत राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता येईल?
भाजप - 48.8 टक्के
शिवसेना - 9 टक्के
काँग्रेस - 10.6 टक्के
राष्ट्रवादी - 11.3 टक्के
इतर - 11.3 टक्के
सांगता येत नाही - 8.9 टक्के
2. तुमच्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार होईल?
भाजप - 37.7 टक्के
शिवसेना - 17.7 टक्के
काँग्रेस - 13.4 टक्के
राष्ट्रवादी - 16.1 टक्के
इतर - 6 टक्के
सांगता येत नाही - 9.1 टक्के
3. राज्यातलं सरकार तुम्ही तातडीने बदलू इच्छिता का?
होय - 55 टक्के
नाही - 44.6 टक्के
माहित नाही - 0.4 टक्के
4. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री तातडीने बदलू इच्छिता?
होय - 54.5 टक्के
नाही - 44.7 टक्के
माहित नाही - 0.8 टक्के
5. तुम्हाला तुमचा आमदार तातडीने बदलायचा आहे का?
होय - 54.7 टक्के
नाही - 43.1 टक्के
माहित नाही - 2.2 टक्के
एबीपी माझासाठी सीव्होटर या एजन्सीने हे सर्वेक्षण केलं आहे. या जनमत चाचणीसाठी राज्यातल्या सर्व 288 मतदारसंघातील 19489 सँपल्स तपासण्यात आले. 16 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले.
एबीपी माझा सीव्होटर या जनमत चाचणीचे अंदाज दैनंदिन ट्रॅकिंग पोल पद्धतीने गेल्या सात दिवसातील वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या राज्यातील मतदारांशी चर्चा करुन काढले आहेत. सीव्होटरने या जनमत चाचणीसाठी राज्यातल्या सर्व सामाजिक-आर्थिक स्तरातील वेगवेगळ्या वयोगटातील मतदारांशी चर्चा केली. या जनमत चाचणीच्या अंदाजातील मार्जिन ऑफ एरर मॅक्रो लेवलवर +/- 3% तर मायक्रो लेवलवर +/- 5% आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
हिंगोली
महाराष्ट्र
Advertisement