23 तारखेनंतर कोणाला तुरुंगात टाकायचं याची यादी तयार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Sanjay Raut : 23 तारखेनंतर तुरुंगाच्या किल्ल्या आमच्याकडे असतील. जिथं आम्ही राहिलो तिथं कोणाला पाठवायचं याची यादी आमच्याकडे तयार असल्याचे संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : प्रश्न विचारले की आम्हाला तुरुंगात टाकल जातं. आम्ही त्यांच्या चोऱ्या पकडल्या की, आमच्यावर ईडीच्या (ED) धाडी टाकल्या जातात. आम्ही भारतीय जनता पक्षाला (BJP) दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, तर आमच्यासारख्या काही लोकांना तुरुंगात डांबण्यात आल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. लक्षात ठेवा 23 तारखेनंतर तुरुंगाच्या किल्ल्या आमच्याकडे असतील. जिथं आम्ही राहिलो तिथं कोणाला पाठवायचं याची यादी आमच्याकडे तयार असल्याचे संजय राऊत म्हणाले.
तुरुंगाच्या किल्ल्या आमच्याकडे असतील
आम्ही घाबरलो नाही, आमच्यावर भारतीय जनता पक्षात जाण्यासाठी दबाव आला होता. मात्र आमच्या बायका मुलांनी आम्हाला सांगितले की, तुमच्यासाठी आम्ही मरण पत्करु मात्र भाजपला शरण जाणार नाही. मात्र, लक्षात ठेवा 23 तारखेनंतर तुरुंगाच्या किल्ल्या आमच्याकडे असतील, जिथे आम्ही राहिलो तिथे कोणाला पाठवायचं याची यादी आमच्याकडे तयार आहे,.अनिल अण्णा गोटे यांनी यादी तयार करावी, त्यांच्याकडे फार मोठी यादी आहे. त्यांच्याकडे यादी तयार असते. मात्र भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई नाही झाली की ते बंड करतात, असेही संजय राऊत म्हणाले.
आम्ही ज्यांच्या चोऱ्या टाकल्या ते आम्हाला ईडीची भीती दाखवतायेत
आम्ही ज्यांच्या चोऱ्या टाकल्या ते आम्हाला ईडीची भीती दाखवत असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. पण आम्ही मरण पत्करु पण भाजपला शरण जाणार नसल्याचे राऊत म्हणाले. 23 तारखेनंतर आमच्याकडे तुरुंगाच्या किल्ल्या येणार असल्याचेही राऊत म्हणाले.
उत्तर महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा म्हणून धुळे जिल्ह्याकडे पाहिले जाते. तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग धुळे जिल्ह्यातून जात असताना देखील गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या समस्या या कायम असल्याच प्रत्येक निवडणुकीच्या वेळी बोलले जाते. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात (Dhule City Assembly Constituency) यंदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरणार आहे. महाविकास आघाडीकडून (mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांना रिंगणात उतरवले आहे. तर त्यांच्याविरोधात महायुतीतून (Mahayuti) भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल (Anup Agrawal) यांचे आव्हान असणार आहे. तसेच एमआयएमचे विद्यमान आमदार फारूक शाह (Faruk Shah) हे देखील निवडणुकीच्या आखाड्यात असल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे आज अनिल गोटे यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी महायुतीवर चांगलाच निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या: