एक्स्प्लोर

Vishwajeet Kadam on Sanjay Raut : संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका

Vishwajeet Kadam on Sanjay Raut : सांगली लोकसभेच्या वादापासून सातत्याने विश्वजित कदम आणि संजय राऊत यांच्यात सातत्याने खटके उडाले आहेत. 

Vishwajeet Kadam on Sanjay Raut : गेल्या वेळी मी निवडून आलो आणि सरकार येईल असे वाटत नव्हते. मी विनोदाने म्हणत असतो, संजय राऊत याच्या अंगात आले आणि सरकार आले, पण अडचण एवढी झाली की राऊतांच्या अंगातील कधी उतरलेच नाही म्हणून सरकार गेल्याची टीका काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. सांगलीमधील कडेगाव तालुक्यात प्रचार सभेदरम्यान कदम बोलत होते. सांगली लोकसभेच्या वादापासून सातत्याने विश्वजित कदम आणि संजय राऊत यांच्यात सातत्याने खटके उडाले आहेत. 

आणि आमच्या महायुतीच्या नेत्यांनी झक मारली

विश्वजित कदम म्हणाले की, पॉस्कोन कंपनी महाराष्ट्र मध्ये येणार होती. 2 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध होणार होता. पण दिल्लीतून फोन आला आणि आमच्या महायुतीच्या नेत्यांनी झक मारली आणि कंपनी गुजरातला देऊन टाकली. आपला हा महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही, पण या महायुतीच्या नेत्यांनी पाप केले. या महाराष्ट्राला दिल्ली आणि गुजरातसमोर झुकावे लागले, पण तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहा, पुन्हा महाराष्ट्र कुणाच्या बापाच्या समोर झुकणार नाही, असे विश्वजित कदम म्हणाले. 

खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम आता आमनेसामने 

दरम्यान, सांगलीत जयश्री पाटील यांच्या उमेदवारीवरून खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम आमने-सामने आले आहेत. लोकसभेला बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी भरून निवडणूक जिंकलेल्या विशाल पाटील यांनी जयश्री पाटील यांना पाठिंबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी जयश्री पाटील यांच्या प्रचारसभेत सहभागी होत त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. सांगलीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील आहेत. 

तसेच यावर ठाम राहत उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. लोकसभेवेळी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी भरलेल्या विशाल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या विश्वजित कदम यांनी विधानसभेवेळी वेगळा पवित्रा घेतला आहे. बंडखोरास मत दिले तर ती भाजपाला मदत होणार असल्याचे विश्वजित कदम यांनी सांगत एक प्रकारे जयश्री पाटील यांना आव्हान दिल्याची चर्चा आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तीन दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तीन दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?
Dhule Crime: धुळ्यात सरपंचांच्या जोडीचा प्रताप, पेट्रोलपंपासाठी 2.5 लाखांच्या लाचेची मागणी, पण एसीबीच्या सापळ्यात अडकले
धुळ्यात सरपंचांच्या जोडीचा प्रताप, पेट्रोलपंपासाठी 2.5 लाखांच्या लाचेची मागणी, पण एसीबीच्या सापळ्यात अडकले
Mutual Fund SIP :शेअर बाजारात सातत्यानं घसरण, एसआयपी बंद करण्याचा गुंतवणूकदारांचा ट्रेंड, डिसेंबरमध्ये सर्व विक्रम मोडले 
अस्थिर बाजारानं गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग,विक्रमी संख्येनं एसआयपी खाती बंद, डिसेंबरमध्ये सर्व रेकॉर्ड मोडले
Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thane Station Washroom : कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे थेट शौचालय बंद, ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रकारABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 25 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सSpecial Report Mamta Kulkarni takes 'sanyaas' at Mahakumbh : ममता कुलकर्णीनं संन्यास का घेतला?Saif Ali Khan Statement to Police : सैफनं पोलिसांच्या जबाबात सांगितली 'आप बीती'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तीन दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तीन दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?
Dhule Crime: धुळ्यात सरपंचांच्या जोडीचा प्रताप, पेट्रोलपंपासाठी 2.5 लाखांच्या लाचेची मागणी, पण एसीबीच्या सापळ्यात अडकले
धुळ्यात सरपंचांच्या जोडीचा प्रताप, पेट्रोलपंपासाठी 2.5 लाखांच्या लाचेची मागणी, पण एसीबीच्या सापळ्यात अडकले
Mutual Fund SIP :शेअर बाजारात सातत्यानं घसरण, एसआयपी बंद करण्याचा गुंतवणूकदारांचा ट्रेंड, डिसेंबरमध्ये सर्व विक्रम मोडले 
अस्थिर बाजारानं गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग,विक्रमी संख्येनं एसआयपी खाती बंद, डिसेंबरमध्ये सर्व रेकॉर्ड मोडले
Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
Embed widget