Wani Assembly Election 2024 : वणी विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसैनिकाची कमाल, संजय देरकर विजयी, भाजपच्या रेड्डींना धक्का
Wani Assembly Election 2024 : वणी विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा पराभव झाला. शिवसेनेचे संजय देरकर विजयी झाले आहेत.
Wani Assembly Election 2024 यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत. यवतमाळ , राळेगाव, वणी, उमरखेड, पुसद, दिग्रस, आर्णी हे विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यात आहेत. यापैकी वणी विधानसभा मतदारसंघ महायुतीत भाजपकडे गेला आहे. भाजपनं या विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना संधी दिली होती. शिवसेनेच्या संजय देरकर यांनी विजय मिळवला आहे
संजय देरकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती ते विजयी झाले. काँग्रेसच्या संजय खाडे यांनी या ठिकाणी बंडखोरी केली होती मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मनसेजे राजू उंबरकर 21977 यांना मतं मिळाली.
लोकसभेला काय घडलं?
वणी विधानसभा मतदारसंघाचा समावेश चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आहे. वणी विधानसभा मतदारसंघातील मतदारांना लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिला होता. वणी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना आघाडी मिळाली होती. भाजपचे सुधीर मुनगंटीवार या ठिकाणी पिछाडीवर राहिले होते. काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना 125781 मतं मिळाली होती. तर, भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांना 69113 मतं मिळाली होती.
चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
यवतमाळ जिल्ह्यात महायुतीनं 5 जागा जिंकल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिग्रसची जागा मिळाली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुसदची जागा मिळाली आहे. राळेगाव, अर्णी आणि उमरखेड या जागा भाजपनं जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीला 2 जागांवर विजय मिळाला.
इतर बातम्या :