Yavatmal Assembly Election : यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा लढती ठरल्या, कोण बाजी मारणार? 7 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Yavatmal District Vidhan Sabha Election 2024 : यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेच्या 7 जागा आहेत. या 7 जागांवर काट्याची लढाई होत आहे.
Yavatmal District Vidhan Sabha Election 2024 यवतमाळ : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर शेतमालाच्या दराचा मुद्दा प्रमुख आहे. कापूस आणि सोयाबीनच्या दराचा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जिल्हा म्हणून देखील यवतमाळची ओळख आहे. यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. यवतमाळ, राळेगाव, वणी, आर्णी, उमरखेड, पुसद,दिग्रस हे मतदारसंघ आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघाच्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात मंत्री संजय राठोड विरुद्ध काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे रिंगणात आहेत. माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके देखील रिंगणात आहेत. यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ (Yavatmal District Vidhan Sabha Election) आहेत. सात पैकी सहा मतदारसंघात मविआच्या उमेदवारांना आघाडी मिळाली. तर, केवळ पुसद या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळाली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत इथून भाजपला 5, शिवसेनेला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली होती.
यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
क्रमांक | विधानसभा मतदारसंघ | महायुती | महाविकास आघाडी | वंचित / अपक्ष | विजयी उमेदवार |
1 | यवतमाळ | मदन येरावार (BJP) | बाळासाहेब मांगुळकर (Congress) | ||
2 | राळेगाव | अशोक उऊके (BJP) | वसंत पुरके (Congress) | ||
3 | उमरखेड | किसन वानखेडे (BJP) | साहेबराव कांबळे (Congress) | ||
4 | आर्णी | राजू तोडसाम (BJP) | जितेंद्र मोघे (Congress) | ||
5 | वर्णी | संजीव रेड्डी बापुराव बोदकुरवार(BJP) | संजय देरकर (Shivsena UBT) | ||
6 | पुसद | इंद्रनील नाईक (NCP-AP) | शरद मेंद (NCP-SP) | ||
7 | दिग्रस | संजय राठोड (Shivsena) | माणिकराव ठाकरे (Congress) |
यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
यवतमाळ विधानसभा मतदारसंघ
यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अनिल उर्फ बाळासाहेब मांगळुकर यांच्यापुढं भाजपच्या विद्यमान आमदार मदन येरावार यांचं आव्हान आहे.
राळेगाव विधानसभा मतदारसंघ (अनुसूचित जमाती)
भाजपकडून या ठिकाणी विद्यमान आमदार अशोक उईके यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. काँग्रेसनं माजी मंत्री वसंत पुरके यांना उमेदवारी दिली
आहे.
उमरखेड विधानसभा मतदारसंघ (अनुसूजित जमाती)
उमरखेड या मतदारसंघात भाजपच्या किसन वानखेडे यांची लढत काँग्रेसच्या साहेबराव कांबळे यांच्या विरुद्ध होणार आहे.
आर्णी विधानसभा मतदारसंघ (अनुसूचित जमाती)
भाजपनं आर्णी विधानसभा मतदारसंघात राजू तोडसाम यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसच्या जितेंद्र मोघे यांचं आव्हान तोडसाम यांच्या विरुद्ध आहे.
वणी विधानसभा मतदारसंघ
वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय देरकर निवडणूक लढवत असून त्यांच्या विरुद्ध भाजपचे विद्यमान आमदार संजीव रेड्डी बापुराव बोदकुरवार रिंगणात आहेत.
पुसद विधानसभा मतदारसंघ
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद मेंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दिग्रस विधानसभा मतदारसंघ
दिग्रस विधानसभा मतदारसंघाची लढत हायव्होल्टेज आहे. इथं शिवसेनेकडून संजय राठोड तर काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे रिंगणात आहेत.
इतर बातम्या :