एक्स्प्लोर

भिवंडी पूर्वमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या रुपेश म्हात्रेंचा बंडाचा झेंडा, श्रीकांत शिंदे ते आदित्य ठाकरेंच्या निवडणुकीपर्यंत सगळंच काढलं, उमेदवारी कायम ठेवणार

Rupesh Mhatre : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रुपेश म्हात्रे यांनी बंड केलं असून ते अपक्ष म्हणून भिवंडी पूर्वमधून लढणार आहेत. इथं मविआनं जागा सपाच्या रईस शेख यांच्यासाठी सोडली आहे.

ठाणे : भिवंडी पूर्वमध्ये महाविकास आघाडीकडून समाजवादी पार्टीचे रईस शेख यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.शनिवारी संध्याकाळी त्यांच्या समर्थकांनी भिवंडी शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर जिल्हा प्रमुख मनोज गगे,तालुका प्रमुख कुंदन पाटील, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक, काँग्रेस,पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने रुपेश म्हात्रे यांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले होते. 
 
कल्याण मध्ये एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना खासदार बनवण्यासाठी भिवंडीत आम्हाला कपिल पाटील यांचे काम करण्यास भाग पाडलं तर नुकत्याच झालेल्या  लोकसभा निवडणुकीत पक्षाची ताकद मोठी असताना सुद्धा चार पक्ष फिरून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी आम्ही काम केलं.प्रत्येक वेळेस आमचा बळी का म्हणून द्यायचा, असा सवाल रुपेश म्हात्रे यांनी केला.

वरळीत उद्धव ठाकरे यांच्या मुलाला फायदा होईल म्हणून भिवंडीत समाजवादी पक्षाला शिवसेना पक्षाने समर्थन देऊन आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. आम्ही हा अन्याय कदापी  सहन करणार नसून या निवडणुकीच्या मैदानात लढणार असा ठाम निर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे यांनी व्यक्त करीत पक्षा विरोधात बंड पुकारले आहे.मी कोणाला हरवण्यासाठी किंवा जिंकवण्यासाठी ही निवडणूक लढवत नसून मला जनतेच्या मदतीने ही निवडणूक जिंकायची आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे .

 काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे हे  29 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करताना समाजातील पक्षाचे उमेदवार रईस शेख यांच्या शक्ती प्रदर्शन रॅलीमध्ये सहभागी झाले होते. परंतु, आज रुपेश म्हात्रे समर्थकांनी आयोजित केलेला सभेला माजी खासदार सुरेश टावरे यांसह काँग्रेस पदाधिकारी सहभागी झाले होते.

 सुरेश टावरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,समाजवादी पार्टीचे रईस शेख हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही त्यांच्या सोबत होतो.पण त्यांचे राज्यातील पक्षप्रमुख अबू आझमी हे त्यानंतर भिवंडी पश्चिम विधानसभेत महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार दयानंद चोरगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असताना तिथे समाजवादी पक्षाच्या रियाज आझमी यांचा अर्ज दाखल करण्यासाठी सुध्दा आले म्हणजे होते. त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही मग आम्ही सुध्दा रुपेश म्हात्रे यांच्या सोबत राहणार असा विश्वास व्यक्त केला  टावरेंनी व्यक्त केला. 

इतर बातम्या :

फडणवीसांचा चेहरा पुढे केल्यास 5 ते 7 टक्के मतं कमी होतील, अमित शाहांना त्यांनाच मुख्यमंत्री करायचंय : रोहित पवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025Top 25 | टॉप 25 बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा सुपरफास्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget