एक्स्प्लोर

Raj Thackeray : 'तुला वरळीतून निवडून यावच लागेल', पुतण्या आदित्यला पाडण्यासाठी संदीप देशपांडेंना 'राज'मंत्र

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांच्यासाठी खास पत्र लिहिलं आहे.

Raj Thackeray :  विद्यमान आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे पुन्हा एकदा वरळी विधानसभेसाठी मैदानात उतरले आहेत. महायुतीकडून अद्याप आदित्य ठाकरेंच्या विरोधात आव्हान उभं करण्यात आलं नसलं तरीही मनसेने मात्र त्यांचा गडी या रणांगणात उतरवला आहे. संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना वरळीची उमेदवारी मनसेकडून देण्यात आली आहे. त्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी संदीप देशपांडेंसाठी खास पत्र लिहित संदीप तुला वरळीतून निवडून यावच लागेल असा राजमंत्रही दिला आहे. 

राज ठाकरेंच्या या पत्रामुळे पुन्हा एकदा काकाने पुतण्याविरुद्ध शिवतीर्थ आणि शिवसेना भवनाच्या अंगणातच शड्डू ठोकलाय. आदित्य ठाकरे हे जेव्हा पहिल्यांदा वरळीतून उभे राहिले होते, त्यावेळी मनसेकडून कोणाताही उमेदवार मैदानात उतरवण्यात आला नव्हता. पण अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात असताना ठाकरेंकडून मात्र उमेदवार रिंगणात उतरवण्यात आलाय. त्यानंतर राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांना वरळीचं आव्हान यशस्वीरित्या पेलण्याच्या शुभेच्छा आणि सूचना दिल्या आहेत. 

राज ठाकरेंचं संदीप देशपांडेंना पत्र

राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांना एक खास पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, प्रिय संदीप, सस्नेह जय महाराष्ट्र! वरळीतून तुला निवडून यावच लागेल... शुभेच्छा..या पत्रावर राज ठाकरे यांची स्वाक्षरी देखील आहे. 

माहीमच्या मैदानात तिहेरी लढत

राज ठाकरेंचे पुत्र यापलिकडे ओळख निर्माण करण्यासाठी अमित ठाकरे आता विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. पण ही निवडणूक जरी अमित ठाकरे लढवणार असले तरीही ही परीक्षा मात्र राज ठाकरेंची आहे. मुंबईतील मनसेच्या बालेकिल्ल्यातूनच अमित ठाकरेंना मैदानात उतरवण्यात आलंय. पण असं असलं तरीही या मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. कारण ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्हींकडून त्यांचे उमेदवार माहिमच्या मैदानात उतरवण्यात आलेत. 

माहिम जसा हा मनसेला बालेकिल्ला तसाच ठाकरेंच्या शिवसेनेचाही गड आहे. त्यातच 2019 मध्ये राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना ती परतफेड करण्याची संधी होती. पण ठाकरेंनी याच मतदारसंघातून त्यांचा महेश सांवत हा शिलेदार उभा केलाय. म्हणूनच जसं अमित ठाकरेंना महेश सावंत यांचं आव्हान आहे, त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना संदीप देशपांडेंचं आव्हान दिलंय.  त्यामुळे कोणते ठाकरे कोणतं आव्हान पेलण्यात यशस्वी ठरणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे.

 

ही बातमी वाचा : 

ठाकरेंचे उमेदवार ठरले, नितेश अन् निलेश राणेंविरोधात कोण? नारायण राणेंच्या कट्टर विरोधकांना तिकीट

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget