Parvati Assembly Election 2024 : पर्वती विधानसभा मतदारसंघात गटबाजीमुळे डोकेदुखी वाढणार? चौथ्यांदा माधुरी मिसाळांना मिळाली संधी
Parvati Assembly Election 2024 : माधुरी मिसाळ यांना पक्षांतर्गत असल्याचं बोललं जात आहे. महापालिकेतील भाजपचे गटनेते श्रीनाथ भीमाले आणि भाजपचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी उमेदवारीसाठी मोठी फिल्डिंग लावलेली होती.
Parvati Assembly Election 2024 : पर्वती विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. माधुरी मिसाळ या भाजपकडून सलग तीन टर्म मतदारसंघाच्या आमदार राहिल्या आहेत. यावेळी त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाच्या अश्विनी कदम यांचं आव्हान असणार आहे. असं असलं तरीही अश्विनी कदम यांच्या पेक्षाही मोठा आव्हान माधुरी मिसाळ यांना पक्षांतर्गत असल्याचं बोललं जात आहे. महापालिकेतील भाजपचे गटनेते श्रीनाथ भीमाले आणि भाजपचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी उमेदवारीसाठी मोठी फिल्डिंग लावलेली होती. (Parvati Assembly Election 2024)
मतदार संघात प्रचाराला देखील त्यांनी सुरुवात केली होती. भाजपाच्या या अंतर्गत वादाचा परिणाम या निवडणुकीवर होणार का? हे पाहावे लागणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना 29 हजाराचं मताधिक्य मिळालं होतं. या विधानसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 4 लाख 16 हजार आहे आणि हा विधानसभा मतदारसंघ पुण्यात पर्वती, दांडेकर पूल, स्वारगेट या सगळ्या भागांचा बनलेला आहे. मोठ्या हाउसिंग सोसायटी आणि काही झोपडपट्ट्यांचा भाग आणि काही बैठी घरं अशी या मतदारसंघाची रचना आहे. त्यामुळे मतदारांमध्ये देखील विविधता या मतदारसंघात पाहायला मिळते. या मतदारसंघात देखील वाहतूक कोंडी सुरक्षा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा पावसाचं साचलेलं पाणी या मतदारसंघातल्या मुख्य समस्या आहेत यात समस्यांना अनुसरून ही निवडणूक लढली जावी आणि आपले प्रश्न सुटावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
पर्वती मतदारसंघात कशी आहे परिस्थिती
भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीमध्ये सलग चौथ्यांदा माधुरी मिसाळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 2009 पासून माधुरी मिसाळ पर्वती मतदारसंघाच्या आमदार आहेत. सलग चार वेळा निवडून आलेले भाजपचे माजी नगरसेवक सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आमदारकीसाठी दावा केला होता. मात्र, तरीदेखील माधुरी मिसाळ यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या दोन्ही पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अश्विनी कदम व 2009 मध्ये लढलेले सचिन तावरे देखील मतदारसंघातून इच्छुक आहेत. काँग्रेसकडून माजी महापौर आबा बागूल व अभय छाजेड यांचे नाव पुढे आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल इच्छुक आहेत.
2019 ला मिळालेले मताधिक्य
माधुरी मिसाळ - 97012
अश्विनी कदम - 60245