Pankaja Munde : तुमच्या डोळ्यासमोर कमळ येईल पण घड्याळाचं बटण दाबा, त्यांनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं : पंकजा मुंडे
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांना आमदार करायचं असल्याचं म्हटलं. निवडणूक यावेळी सोपी आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीनं आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात मार्गदर्शन केलं. यावेळी पकंजा मुंडे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. भाऊबीजेला बहिणीनं भावाला ओवाळायचं असतं अन् बहिणीला जेवण द्यायचं असतं. ही भाऊबीज आगळी वेगळी करु असा विचार केल्याचं त्यांनी म्हटलं. जो भाऊ एका दशकानंतर ओवाळणीला आला तो माझा भाऊ, या एक दशकात जेव्हा माझा भाऊ माझ्यापासून दूर होता तेव्हा माझी काळजी घेणारे माझे भाऊ या सगळ्यांची मिळून दिवाळी साजरी करतोय, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
खरंतर त्या काळात जेव्हा श्रीकृष्ण जेव्हा गेले होते शिष्टाई करायला कौरवांच्या दरबारात, युद्ध नको युद्ध नको पांडवांना फक्त पाच गावं द्या, कौरवांनी ते स्वीकारलं असतं तर कदाचित महाभारत टळलं असतं. कदाचित महाभारत याच्यासाठी होत असाव न्याय अन्यायाच्या लढाईत न्यायाचा विजय होतो. पण राजकारणातलं महाभारत वेगळं आहे. राजकारणात महाभारत घडवलं जातं. राजकारणात भावा भावात वितुष्ट आणलं जातं.कुणाच्याही खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केल जातं. युद्ध टळल असतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
मी जेव्हा 2009 ला राजकारणात आले तेव्हा एक महिना आधी माझ्या घरी धनूभाऊ तुझ्या प्रचाराला येणार नाही. प्रीतम मुंडे यांचं लग्न असल्याचं कारण सांगितलं होतं. माझ्या मनात देखील नव्हतं विधानसभा लढवायची आहे. कधी डोक्यात नव्हतं की परळी विधानसभेची पहिली महिला आमदार होईनं. माझ्या जीवनात काही वाईट केलं नाही. एक चांगलं केलं माझ्या बापाचा शब्द खाली पडू दिलं नाही. धनंजयला माहिती आहे लग्नपत्रिका छापल्यानंतर नवरा बघितला, आताच्या काळात असं होतं नव्हतं. माझा एवढा विश्वास गोपीनाथ मुंडेंवर होता, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
चार पाच महिन्यानंतर धनंजय मुंडे आमदार झाले. त्यांनी भाषण केलं होतं पंकजा आणि मी एक आहोत, अजून ते भाषण आठवतं. त्यानंतर काय घटना घडल्या, काय झालं जुगलशेठच्या घरी त्या दिवशी आमचं घर फुटलं आणि महाराष्ट्र छाती बडवून रडत होता. मला तोपर्यंत कळलं की माझ्या घराची किती किंमत आहे. बाबा एकटे पडले या कल्पनेनं म्हणून मी राजकारणात आले, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
मी ज्यावेळेस लोकसभेला उभे राहिले तेव्हा मला आनंद झाला माझा भाऊ माझ्याबरोबर आला आणि प्रचार केला. त्यांचे कार्यकर्ते, जिल्ह्यातील आमदारांनी पंडित, सोळंके, धस. आजबे यांनी नाराज नसल्याचं सांगितलं. मला हे आठवत होतं, की राजकारणाच्या चिखलात तुला कमळ म्हणून काम करायचं आहे, असं बाबांनी सांगितलेलं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
लोकसभा इच्छा नसताना लढले
मी लोकसभा माझी इच्छा नसताना लढले. लोकसभा निवडणुकीनंतर सगळे रडत होते, मात्र मी रडले नाही. त्या पोरांनी आत्महत्या केली तेव्हा मी रडली, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
माझ्या जीवनातल्या संघर्षाला तुम्ही जबाबदार नाहीत, तुम्ही माझी साथ दिली. मी सतत संघर्षात राहावं या लोकांच्या प्रयत्नाला यश मिळू नये म्हणून मी हा संघर्ष बंद करायचा. मला एकेदिवशी प्रशांत जोशींचा एकदा फोन आला त्यावेळेस तुम्ही साहेब ऍडमिट आहेत, असं सांगितलं. तेव्हा कशासाठी भांडतोय, असा विचार केला.
आता विधानसभेत आपले कमळ चिन्ह नाही, पण तुम्ही मशीनवर कमळ शोधणार आहात हे मला माहीत आहे. तुम्ही कमळ शोधणार आहात आता वाटते कमळ डोळ्यासमोर धरा आणि घड्याळाचं बटण दाबा, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
धनुभाऊ राष्ट्रवादीकडे गेले, त्यांच्या कार्यकर्त्यांनी कमळाचं बटण दाबलं होतं. आता असं वाटतं की धनंजय मुंडे यांनी कमळ घेतल असत तर बरं झालं असतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आता आपल्याला धनंजय मुंडेंना आमदार करायचा आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
इतर बातम्या :