Maharashtra Assembly Election 2024 : भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
Maharashtra Assembly Election 2024 : भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांची वेळीच मध्यस्थी केल्यानं वाद मिटला.
भाईंदर : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारंसघात मतदान प्रक्रिया पार पडतेय. काही मतदारसंघांमध्ये राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते आपापसात घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बीड, वर्धा, कोल्हापूर या जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यकर्ते आमने सामने आल्याचं समोर आलं होतं. आता भाईंदर मध्ये देखील भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता आणि अपक्ष उमेदवार गीता जैन यांचे समर्थक आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं.
नेमकं काय घडलं?
भाईंदर पश्चिम येथील 60 फुटी रोडवर नरेंद्र मेहता आणि गीता जैन यांच्या समर्थकांमध्ये एक छोटीशी बाचाबाची झाली. ही घटना त्यावेळी घडली जेव्हा दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या बूथजवळ उपस्थित होते. दोन्ही गटांमध्ये तणाव वाढल्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले, पण स्थानिक पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
घटना अशी घडली की दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या जवळ आले आणि त्यानंतर काही शाब्दिक वादावादी सुरू झाली. नरेंद्र मेहता यांनी त्यांच्या विरोधकांवर आरोप केला की, गीता जैन यांच्या समर्थकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकावले आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आणि यांच्यातील तीव्र वादविवादामुळे छोट्या स्वरूपाची शारीरिक झडप ही झाली.
नरेंद्र मेहता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, "आपल्या कार्यकर्त्यांना धमकवून घाबरवले जात आहे. ही संपूर्णपणे अनुशासनबाह्य आणि असंवेदनशील वर्तणूक आहे. आम्ही या प्रकाराला सहन करणार नाही."
बीडच्या आष्टीमध्ये सुरेश धस आणि महेबुब शेख समर्थक भिडले
बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. परळी विधानसभा मतदारसंघ वगळता पाचही मतदार संघामध्ये सुरळीतपणे मतदान प्रक्रिया दुपारपर्यंत पार पडली होती. आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी गाव भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार महबूब शेख यांच्या समर्थकांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली.
दरम्यान, वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. यानंतर नितेश कराळे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.
इतर बातम्या :
मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, करमाळा तालुक्यातील व्हिडीओ व्हायरल