Mira Bhayandar : ज्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ बाहेर आले, कॅरेक्टर जगजाहीर आहे, अशा नरेंद्र मेहतांना तिकीट का? गीता जैन यांचा हल्ला
Mehta Mira Bhayandar Seat : मुंबई महानगर प्रदेशातील मीरा भाईंदरची जागा भाजपकडे गेली आहे. येथून नरेंद्र मेहता यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीतील एकूण दोन उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील मीरा भाईंदरची जागा भाजपकडे गेली आहे. येथून नरेंद्र मेहता यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. यापूर्वी मिरा भाईंदरच्या महापौरपदी असलेल्या गीता जैन यांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा होती.
मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ज्या ज्या आमदारांनी त्यांना साथ दिली होती. त्यांचे तिकीट कापणार नाही, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांनी उचलली होती. पण आता शिंदेना समर्थन देणाऱ्या मिरा भाईंदरच्या विद्यमान आमदार गीता जैन यांची ही तिकीट कापली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या गीता जैन यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. याआधी पालघर मधून विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचे तिकिट कापले. त्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला, ते सध्या नॉट रिचेबल आहेत.
एकनाथ शिंदे यांनी शब्द न पाळल्याने आपण व्यतीत झाल्याच म्हणत, एबीपी माझाशी बोलताना गीता जैन यांनी आपण रडणार नसून, लढणार असल्याच स्पष्ट केलं आहे. गीता जैन म्हणाल्या की, नरेंद्र मेहता यांना पक्षाने का उमेदवारी दिली, तेच कारण शोधायला मलाही खूप कठीण वाटते. कारण समोरून जेव्हा फोन करून मला शब्द दिला जातो आणि त्यानंतर जर असं काय होते की पण त्यांनी स्पष्ट असं काही कारणही सांगितलं नाही.
माझ्याशी सकाळी ते फोनवर बोलली आणि एकच सांगितलं माझं मजबुरी होती सॉरी. आता त्यांची काय मजबुरी होती हे त्यांनाच माहिती, पण ज्यांच्यावर छब्बीस पेक्षा जास्त एफआयआर आहे. ज्यांच्यावर एवढे गुन्हे आहेत. ज्यांचा भ्रष्टाचार आणि कॅरेक्टर जग जाहीर आहे. ज्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ बाहेर आले, तरी त्याला पार्टीनी उमेदवारी दिली. मला खरंच मोठा प्रश्न पडला आहे की अशी काय मोठी त्यांची मजबुरी असावी.
हे ही वाचा -