(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar on Jayant Patil : करेक्ट कार्यक्रम करायचं त्याच्या हातात नाही, इस्लामपुरात अजितदादांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल
Ajit Pawar on Jayant Patil : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Ajit Pawar on Jayant Patil, सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार निशिकांत पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेतून अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. "राजारामबापूंनी उभ्या केलेल्या संस्थांमध्ये नंतर जयंत पाटील यांनी काय केलं? त्या संस्था योग्य पद्धतीने वाढवल्या का त्याचा लोकांना फायदा झाला का?" असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.
राजारामबापूंनी उभ्या केलेल्या संस्थांमध्ये नंतर जयंत पाटील यांनी काय केलं?
अजित पवार म्हणाले, करेक्ट कार्यक्रम करायचं त्याच्या हातात नाही. ते जनतेच्या हातात आहे. राजारामबापूंनी उभ्या केलेल्या संस्थांमध्ये नंतर जयंत पाटील यांनी काय केलं? त्या संस्था योग्य पद्धतीने वाढवल्या का त्याचा लोकांना फायदा झाला का? असला मुख्यमंत्री करायचा का? असा सवालही अजित पवार यांनी केला.
आपल्यापुढे जाणाऱ्याला जिरवण्याचे काम इथे केलं गेलं
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आपल्यापुढे जाणाऱ्याला जिरवण्याचे काम इथे केलं गेलं. आता वाळव्यात परिवर्तन अटळ आहे. काही लोकांचा सांगली जिल्ह्यात नाही, तर सातारा जिल्ह्यात देखील अनेकांना त्रास होतोय. इस्लामपूर मधील सभेतच आर आर यांना तंबाखू खाऊ नका असं म्हटलं होतं, पण आर आर याना मी बोललेले वाईट वाटलं होतं.
निशिकांत पाटील यांना संधी द्या बारामती पेक्षा चांगले शहर बनवूया
कुणाच्या खोड्या काय कशा आहेत हे मला माहित आहे. वाळवेकरांना सुट्टीवर पाठवायला चांगली संधी आली आहे. परिवर्तन अटळ आहे पण तुमच्यात फूट पडू देऊ नका. फुट पाडण्यात माणूस तरबेज आहे. इस्लामपूरची बारामती करतो असं 2009 पासून सांगतोय. सात वेळा संधी दिली पण त्या बाबाने काही बारामती केली नाही, आपले बाराच वाजवलेत. यावेळी निशिकांत पाटील यांना संधी द्या बारामती पेक्षा चांगले शहर बनवूया. राजारामबापूंनी उभ्या केलेल्या संस्थांमध्ये नंतर जयंत पाटील यांनी काय केलं? त्या संस्था योग्य पद्धतीने वाढवल्या का त्याचा लोकांना फायदा झाला का? असला मुख्यमंत्री करायचा का? आपल्यापुढे जाणाऱ्याला जिरवण्याचे काम इथे केलं गेलं, असंही अजित पवार म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या