Akola Assembly Election : अकोला पश्चिममध्ये काँग्रेसने दिली टफ ‘फाइट’; काँग्रेसचे साजीदखान पठाण 1283 मतांनी विजयी, भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसच्या ताब्यात
Akola Assembly Election : तब्बल 29 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी पक्ष नेतृत्त्वाला कसरत करावी लागली मात्र, गड हातातून गेला आहे.
अकोला: अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा तब्बल 29 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी पक्ष नेतृत्त्वाला कसरत करावी लागली आहे. या मतदारसंघातून लढण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी होती. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात तब्बल 29 वर्षे भाजपचा झेंडा फडकावणारे ज्येष्ठ नेते, तथा आमदार गोवर्धन शर्मा यांचं 3 नोव्हेंबर 2023 रोजी निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. लोकसभा निवडणुकीबरोबर अकोला पश्चिमच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, उच्च न्यायालायानं ही निवडणूक रद्द केली. शर्मा यांनी तळागाळात पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करून अकोल्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. सलग सहा निवडणुकांत विजय खेचून आणणाऱ्या शर्मा यांच्या पश्चात ती परंपरा कायम राखण्याचं आव्हान भाजपपुढे होतं. मात्र भाजपच्या ताब्यातून गड काँग्रेसकडे गेला आहे.
अकोला पश्चिम :
एकूण मतदार : 351092
झालेले एकूण मतदान : 204060
नोटा : 1257
अवैध मते : 172
रद्द केलेली मते : 44
प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
उमेदवार पक्ष मिळालेली मते
साजिदखान पठाण काँग्रेस 88718
विजय अग्रवाल भाजप 87435
हरीश आलिमचंदानी अपक्ष 21481
डॉ. अशोक ओळंबे प्रहार 2127
राजेश मिश्रा अपक्ष 2653
काँग्रेसचे साजीदखान पठाण 1283 मतांनी विजयी झाले आहेत.
2019 ची स्थिती काय?
गोवर्धन शर्मा – भाजप – 73 हजार 262 मते
साजिद खान – काँग्रेस – 70 हजार 669 मते
गोवर्धन शर्मा यांचा 3 हजार मतांनी विजय झाला.