Nita Ambani Marathi Video: नीता अंबानींचं मराठी ऐकलं का? मुंबईत फ्लॅट घेत महाराष्ट्रावर गरळ ओकत सुटलेल्या भाजप खासदार दुबेंना चपराक देणारा व्हिडिओ
Nita Ambani Marathi Video: नीता अंबानी यांचा नीता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये मराठी बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.अजय अतुल यांचं सुद्धा कौतुक करताना दिसून येत आहेत.

Nita Ambani Marathi Video: विषय हिंदी सक्तीचा असताना मराठी माणसांना मारहाण करण्याची दर्पोक्ती करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंची मग्रुरी कायम आहे. त्यांनी मुकेश अंबानी यांना मारहाण करणार का? अशी विचारणा केली होती. मुकेश अंबानी आणि एसबीआयचे अध्यक्ष, जे मराठी बोलत नाहीत, ते मुंबईत राहतात, त्यांच्यात काहीतरी बोलण्याची हिंमत आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि म्हटले की ते माहीममधील मराठी भाषिक मुस्लिमांकडे का जात नाहीत? असे म्हणत आतापर्यंत नेहमीच गरळ ओकत आलेल्या निशिकांत दुबेंनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
घ्या, अंबानी मॅडमसुद्धा आता सुंदर, शुद्ध मराठीत बोलत आहेत मग आता कुठे आहेत ते टीका करणारे?
— Shubham Karpe | शुभम करपे (@ShubhamKarpe10) July 10, 2025
मराठी माणसाबद्दल दुजाभाव करणारे, मराठी-गुजराती किंवा मराठी विरुद्ध इतर भाषिकांत भांडण लावणारे त्यांनी तरी आता डोळे उघडावेत.
ज्यांना नेहमी मराठी भाषेवर टीका करायची सवय आहे, त्यांनी अंबानी… pic.twitter.com/vFfbB9GgHV
नीता अंबानींचा मराठी व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, नीता अंबानी यांचा नीता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये मराठी बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये संगीतकार अजय अतुल यांचं सुद्धा कौतुक करताना दिसून येत आहेत. त्यामुळे मराठीवरून अंबनी कुटुंबाला वादात ओढणाऱ्या निशिकांत दुबे यांना चपराक आहे. दरम्यान, गुरुवारी सिक्कीमला पोहोचलेले खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान आहे. मराठी भाषेचा आदर केला जातो तसाच तमिळ, तेलगू, कन्नडचाही आदर केला जातो. ज्याप्रमाणे त्यांची प्रादेशिक भाषा आहे आणि त्यांना त्यांची भाषा आवडते, त्याचप्रमाणे बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, उत्तर प्रदेशातील लोकांची हिंदी भाषा आहे. जर ठाकरे कुटुंबीय भाषेच्या आधारावर लोकांना मारहाण करत असतील तर ते आपल्या सहनशीलतेच्या पलीकडे आहे.
महाराष्ट्राच्या कराच्या पैशात सर्वजण योगदान देतात
निशिकांत दुबे आणखी मुक्ताफळे उधळत म्हणाले की, मुंबई किंवा महाराष्ट्र जो कर देतो तो संपूर्ण भारताचे योगदान आहे. याचा मराठा किंवा ठाकरे कुटुंबाशी काहीही संबंध नाही. महाराष्ट्रात कर कोण भरतो? जसे स्टेट बँकेचे मुख्यालय महाराष्ट्रात आहे. एसबीआय सर्वाधिक कर भरते आणि तो महाराष्ट्राच्या खात्यात जातो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राला एलआयसीकडूनही कर मिळतो, तर देशातील सर्व लोक या दोन्ही संस्थांमध्ये योगदान देतात. ठाकरे कुटुंबावर टीका करताना भाजप खासदार म्हणाले की, तुम्ही गरिबांना मारहाण करता. पण मुकेश अंबानी तिथे राहतात, ते खूप कमी मराठी बोलतात. जर तुमच्यात हिंमत असेल तर त्यांच्याकडे जा. माहीममध्ये मुस्लिम लोकसंख्या मोठी आहे, तेही मराठी बोलत नाहीत. जर तुमच्यात हिंमत असेल तर तिथे जा. एसबीआयचे अध्यक्ष मराठी बोलत नाहीत, त्यांना मारहाण करा. ते म्हणाले की, ठाकरे बंधू गरीब आणि मुंबईला उदरनिर्वाहासाठी गेलेल्यांना लक्ष्य करतात.
इतर महत्वाच्या बातम्या
























