Ajit Pawar : आर. आर.पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, सिंचन घोटाळ्याच्या फाईलवरील सही फडणवीसांनी दाखवली, अजित पवारांचा आरोप
Ajit Pawar : माझ्यावर आरोप झाला तेव्हा महाराष्ट्र राज्याची 1 मे 1960 ला निर्मिती होऊन त्या दिवसापर्यंत पगार आणि सगळ्याचा खर्च 42 हजार कोटी रुपयांचा होता, असं अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar on RR Patil मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी तासगावमधील सभेत बोलताना सिंचन घोटाळ्याच्या आरोपाबद्दल भाष्य केलं. 70 हजार कोटी रुपयांचे घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी फाईल गृह मंत्रालयाकडे गेली होती. त्यावेळी गृहमंत्री असणारे आर. आर. पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी असे सांगत फाईलवर सही केली होती. त्यानंतर सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागू झालं. परंतु माझ्या त्या फाईलवर सहीवर राज्यपालांनी सही केली नाही. सरकार बदललं 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारवाई करण्यासाठी माझ्या फाईलवर सही केली.
देवेंद्र फडणवीस याही त्यांच्या बंगल्यावर बोलवून आर. आर. पाटील यांनीच तुमची खुली चौकशी करावी असे आदेश देत सही केल्याचे दाखवलं. ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवला. एवढं सहकार्य केलं. त्यात आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता,असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या संजय काका पाटील यांच्या प्रचार शुभारंभ मेळाव्यातून केला.
मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर बडे बडे शहरो मे छोटे-छोटे हातसे होते रहते है असे म्हणाले आणि आर. आर. पाटील यांना कोणीतरी राजीनामा द्यायला सांगितला. आर आर पाटलांनी थेट राजीनामा देऊन अंजनी गाठले, त्यांच्या राजीनामाचे मला कल्पनाच दिली नाही. आर. आर. पाटील यांना तंबाखू खाऊ नको म्हणून कित्येक वेळा सांगितलं होतं. पण ते माझ्या माघारी हळूच तंबाखू खायचे, असं देखील अजित पवार म्हणाले.
2014 मध्ये विधानसभेचा निकाल लागतो न लागतो तोपर्यंतच साहेबांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. भाजपला बिनशर्थ पाठिंबा कसं काय दिलं जातं. विचारधारा सोडून कशी मदत केली असं विचारल्यावर साहेबांनी सांगितलं सरकार बदललं आहे मदत केली पाहिजे. 1999 मध्ये देखील असंच झालं होतं. सोनिया गांधी यांना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीची स्थापना झाली. लगेच विधानसभा निवडणुका होताच काँग्रेसला पाठिंबा दिला. तेव्हा देखील साहेब म्हणाले सरकारमध्ये गेल्याशिवाय काम होत नाहीत. मग मी गेलो तर काय झालं. माझं काय चुकलं, असं अजित पवार म्हणाले.
तासगाव आणि कवठेमहांकाळ मधूनच संजय काका पाटील यांना मताधिक्य देऊन निवडून आणल्यास तासगाव मधून संजयकाका पाटील यांना आमदारकी मिळेल. तर त्यांना सहकार्य केल्यामुळे कवठेमहांकाळ मधील अजित वाघ घोरपडे यांना देखील आमदारकी मिळेल. त्यामुळे एकाच मतदारसंघात असणाऱ्या दोन तालुक्यांना दोन आमदार मिळतील असा विश्वास देखील अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
इतर बातम्या :
Nawab Malik: नवाब मलिक म्हणाले, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 3 वाजेपर्यंत वाट पाहणार, अन्यथा मी...