एक्स्प्लोर

Nawab Malik: नवाब मलिक म्हणाले, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 3 वाजेपर्यंत वाट पाहणार, अन्यथा मी...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिक यांनी आपल्या अजित पवार गटाचा एबी फॉर्म मिळाल्याचे वृत्त फेटाळून लावले.

मुंबई: अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी मंगळवारी विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केला. मात्र, नवाब मलिक (Nawab Malik) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म अद्याप प्राप्त न झाल्याने त्यांच्यासमोर पेच अजूनही कायम आहे. नवाब मलिक यांना विधानसभेची उमेदवारी देण्यास भाजपचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर केली नव्हती. आज नवाब मलिक हे उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले तरी पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिला नव्हता. पण मी तीन वाजेपर्यंत वाट पाहीन, अन्यथा मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करेन, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

मी आता निवडणूक लढायची नाही, असे ठरवले होते. पण शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातील लोकांच्या आग्रहामुळे मी ही निवडणूक लढवत आहे. या मतदारसंघातील गुंडशाही मोडून काढण्यासाठी मी इथून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचा एबी फॉर्म आला तर मी त्यांच्यावतीने लढेन, अन्यथा अपक्ष लढेन, असे नवाब मलिक यांनी म्हटले.

भाजपच्या दबावामुळे तुम्हाला उमेदवारी नाकारली का? नवाब मलिक म्हणाले...

अजित पवार गटाने भाजपच्या दबावामुळे तुम्हाला उमेदवारी नाकारली का, असा प्रश्न नवाब मलिक यांना विचारण्यात आला. यावर नवाब मलिक यांनी म्हटले, भाजपचा दबाव आहे की नाही, हे मला माहिती नाही. पण अजित पवार संकटकाळात माझ्यासोबत उभे राहिले. मी आता त्यांच्यासोबत उभे राहणे, माझे कर्तव्य आहे. मी पार्टीचा उमेदवारी अर्जही आता भरुन ठेवला आहे. वेळेत एबी फॉर्म आला तर ठीक आहे, नाहीतर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवेन. तीन वाजेपर्यंत मी  वाट पाहीन, तोपर्यंत परिस्थिती स्पष्ट होईल. मला विश्वास आहे की, मी शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

नवाब मलिकांना एबी फॉर्म मिळाल्याची चर्चा

आज सकाळपासून नवाब मलिक यांना अजित पवार गटाने एबी फॉर्म देऊन ठेवल्याची चर्चा रंगली होती. मात्र, अजित पवार गटाने त्यांना एबी फॉर्म उमेदवारी जोडायची की नाही, याबाबत सूचना न दिल्याने नवाब मलिक वेटिंगवर असल्याचे सांगितले जाते. परंतु, नवाब मलिक यांनी आपल्याला कोणताही एबी फॉर्म मिळाल्याची चर्चा फेटाळून लावली.

आणखी वाचा

नवाब मलिकांनी वातावरण 'गुलाबी' केलं, पण कॅमेऱ्यासमोर तोंडातून चकार शब्द काढला नाही, एबी फॉर्मचा सस्पेन्स कायम

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
Prakashrao Abitkar on Gokul Election: 'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?

व्हिडीओ

Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News:
"ते हात घेणारे नाहीत तर लाखोंना देणारे आहेत", पुण्यात शिवसेनेनं लावले फ्लेक्स, मनोज जरांगे पाटलांना टोला
Ramdas Kadam on Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपची माणसं; चौकशी व्हावी, मराठा समाजाला न्याय देण्याबाबत शिंदेंचं योगदान, रामदास कदमांचा टोन बदलला, म्हणाले 'जरांगे साहेब...'
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपची माणसं; चौकशी व्हावी, मराठा समाजाला न्याय देण्याबाबत शिंदेंचं योगदान, रामदास कदमांचा टोन बदलला, म्हणाले 'जरांगे साहेब...'
Gold : दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
Vishwajeet Kadam: सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange: मनोज जरांगेंनी ऑडिओ क्लिप ऐकवताच शिवसेनेत हालचाली; शिंदेंचे वरिष्ठ शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट
मनोज जरांगेंनी ऑडिओ क्लिप ऐकवताच शिवसेनेत हालचाली; शिंदेंचे वरिष्ठ शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट
Manoj Jarange : काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
Hasan Mushrif on Gokul: माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
Gokul Election: शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
Embed widget