एक्स्प्लोर

पनवेल विधानसभा मतदारसंघ | प्रशांत ठाकूर हॅटट्रिक साधणार का?

एकेकाळी शेकापमध्ये असलेल्या प्रशांत ठाकूर यांनी बाहेर पडत काँग्रेसमधून 2009 साली तर भाजपातून 2014 साली आमदरकी पटकावली. गेल्या 10 वर्षात केलेल्या विकास कामांमुळे सध्या प्रशांत ठाकूर यांचे पारडे जड आहे.

पनवेल : कालपर्वापर्यंत शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेला पनवेल विधानसभा मतदारसंघात शेकापला उमेदवार मिळत नसल्याचं विदारक चित्र दिसून येत आहे. पक्षाची चुकलेली ध्येयधोरणे, पारंपरिक पद्धतीमध्ये बदल करण्यात दाखवलेली उदासिनता, बाहेरून आलेल्या लोकांची मने जिंकण्यात आलेले अपयश, पक्षात स्थानिक प्रकल्पग्रस्तांचाच बोलबाला या कारणांमुळे शेकापला पनवेल शहरात उतरती कळा लागली. एकेकाळी शेकापमध्ये असलेल्या प्रशांत ठाकूर यांनी बाहेर पडत काँग्रेसमधून 2009 साली तर भाजपातून 2014 साली आमदरकी पटकावली. गेल्या 10 वर्षात केलेल्या विकास कामांमुळे सध्या प्रशांत ठाकूर यांचे पारडे जड आहे. मात्र दुसरीकडे युती तुटल्यास शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या आघाडीसमोर प्रशांत ठाकूर यांचा कस लागणार आहे.

इतिहास आणि सद्यस्थिती काय सांगते?

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून शेतकरी कामगार पक्षाचे अस्तित्व संपले असले तरी रायगड जिल्ह्यात मात्र या पक्षाने आपली पाळेमुळे घट्ट करून ठेवली आहेत. जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आहे. रायगड जिल्ह्यातील इतर तालुक्यात कार्यकर्ते असले तरी पनवेल विधानसभेत त्यांना घरघर लागली आहे. शेकापचे खासदार असलेले रामशेठ ठाकूर यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पनवेल नगरपरिषदेवर काँग्रेसची सत्ता स्थापन करत पहिल्यांदा शेकापला आव्हान दिलं. त्यानंतर झालेल्या 2009 च्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांचा पराभव करत काँग्रेसचा पहिल्यांदाच पनवेल विधानसभेत झेंडा फटकावला.

मात्र केंद्रात 2014 साली भाजपाची सत्ता येताच भविष्याची पावले ओळखत ठाकूर पिता-पुत्रांनी खारघर टोलनाक्याचा मुद्दा उपस्थित करुन भाजपात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाला विमानतळ, जेएनपीटी बंदर, मुंबई-गोवा हायवेच्या ठेकेदारीची किनारसुध्दा आहे. 2014 ला दुसऱ्यांदा प्रशांत ठाकूर आमदार झाले. पनवेल नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपाने एकहाती सत्ता मिळवत पनवेल महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फटकावला. याची बक्षिसी म्हणून भाजपानेही आमदार प्रशांत ठाकूर यांना सिडकोचे आध्यक्षपद देत रायगड जिल्ह्यात भाजपच्या वाढीसाठी मोकळीक दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांशी प्रकल्पांपैकी एक असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी पनवेल मधेच होत आहे. आघाडी सरकारच्या काळात अनेक वर्ष रखडलेल्या विमानतळाच्या कामालाही गती आली असून येथील प्रकल्पबाधीत गावकऱ्यांचे पुनवर्सन अंतिम टप्प्यात आले आहे. नवी मुंबईनंतर पनवेल भागात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्याने याचा फटका शेतकरी कामगार पक्षाला बसला. शेतकरी कामगार पक्षाने आपल्या पारंपरिक पद्धतीत कोणतेही बदल न केल्याने त्यांचा पाया ठिसूळ झाला. बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांना पदे न देता स्थानिक गावकऱ्यांनाच सर्व ठिकाणी महत्त्व दिल्याने बाहेरुन आलेली लोकांची नाळ शेकापशी जोडली गेली नाही. याचा मोठा फटका पक्षाला विधानसभेत आणि महानगरपालिकेत सहन करावा लागला.

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असली तरी अद्याप शेतकरी कामगार पक्षाकडून पनवेल विधानसभेत कोण लढणार याबाबत गोंधळ कायम आहे. पालिकेतील विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचे नाव आघाडीवर असले तरी निवडणुकीत उभे राहचे की नाही याबाबत प्रीतम म्हात्रे स्वत: द्विधा मनस्थितीत आहेत. प्रीतम म्हात्रे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यास माजी पंचायत समिती सभापती काशीनाथ पाटील शेतकरी कामगार पक्षाचा किल्ला लढवतील.

शिवसेना-भाजपा युती झाल्यास...

भाजपा-शिवसेना युती झाल्यास या ठिकाणी विद्यमान आमदार असलेल्या प्रशांत ठाकूर यांना उमेदवारी मिळू शकते. पनवेल विधानसभा हा मावळ लोकसभेत येत असून येथे शिवसेनेचे श्रीरंग बारणे खासदार आहेत. बारणे यांना पनवेल मतदार संघातून पार्थ पवार यांच्या विरोधात 54 हजाराची आघाडी मिळाली होती. युती न झाल्यास या मतदारसंघात शिवसेनेची ताकद नसल्याने त्याचा भाजप उमेदवारावर विशेष परिणाम होणार नाही. मुंबई सोडून पनवेलच्या शहरी भागात रहायला आलेल्या मराठी लोकांचा टक्का मोठा असून तो शिवसेनेला मानणारा आहे. पण शिवसेनेतील सुंदोपसुंदी आणि पक्षाची पदं वाटप करताना मुंबईतून आलेल्या कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याने शिवसेनेची अवस्था वाईट आहे. याचा परिणाम म्हणजे मनपा निवडणुकीत न फुटलेला भोपळा.

भौगोलिक रचना आणि जातीय समीकरण

पनवेल विधानसभा शहरी आणि ग्रामीण असा विभागलेला आहे. ग्रामीण भागात अजुनही शेतकरी कामगार पक्षाने आपली पकड सोडलेली नाही. पंचायत समितीवर शेकापची सत्ता आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत पनवेलमध्ये शहरीकरण जास्त वाढलेले आहे. खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल भागात राज्यातील इतर भागातून आणि देशातून लोक स्थायिक झाल्याने त्याचा फायदा भाजपला होताना दिसत आहे. कळंबोली भागात पश्चिम महाराष्ट्रमधील माथाडी कामगार वर्गाची संख्या लक्षणीय असल्याने तो राष्ट्रवादीला मानणारा वर्ग आहे. शेतकरी कामगार पक्षाबरोबर शेकापची युती असल्याने आघाडीच्या पारड्यात मते जातील.

पनवेल मतदारसंघातील प्रश्न

  • गरजेपाटी बांधलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा प्रश्न कायम.
  • शहरातील वाहतुकीचा आणि पार्किंगचा गंभीर प्रश्न सोडविण्यात अपयश
  • सीबीडी ते तळोजा मेट्रोचे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले काम
  • तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाचा विळखा
  • ग्रामीण भागातील नागरी कामांची जैसे थे परिस्थिती

मतदार संघातील सुटलेले प्रश्न

  • पनवेलमधून जाणाऱ्या कोकण महामार्गाच्या कामांना मिळालेली गती
  • पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अमृत योजनेच्या 400 कोटीला मंजुरी
  • 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी
  • खारघर टोलानाक्यावरुन हलक्या वाहनांना टोलमुक्ती
  • पांडवकडा पर्यटनस्थळ म्हणून विकासित करायला मिळालेली मान्यता

2014 विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी

  • प्रशांत ठाकूर (भाजप) - 1,25,142
  • बाळराम पाटील (शेकाप) - 1,11,927
  • वासूदेव पाटील (शिवसेना) - 17,953

संभाव्य उमेदवार

  • प्रशांत ठाकूर (भाजप)
  • शिरीष घरत (शिवसेना)
  • प्रितम म्हाञे, काशीनाथ पाटील (शेकाप)
  • राजाराम पाटील (वंचित बहुजन आघाडी)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget