एक्स्प्लोर
लोकसभा निवडणूक जाहीर, महाराष्ट्रात 'या' दिवसांत मतदान होणार
देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

नवी दिल्ली : देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर गुरुवारी 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे.
महाराष्ट्रातले मतदान
11 एप्रिल रोजी महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार
18 एप्रिल रोजी महाराष्ट्रात 10 जागांसाठी मतदान होणार
23 एप्रिल रोजी महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान होणार
29 एप्रिल रोजी महाराष्ट्रात 17 जागांसाठी मतदान होणार
निवडणुकांची घोषणा होताच आजपासून देशात आचारसंहिता लागू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. देशभरात एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.
पहिला टप्पा : 11 एप्रिल 2019 (91 मतदारसंघ)20 राज्यं
दुसरा टप्पा : 18 एप्रिल 2019 (97 मतदारसंघ )13 राज्यं
तिसरा टप्पा : 23 एप्रिल 2019 (115 मतदारसंघ )14 राज्यं
चौथा टप्पा : 29 एप्रिल 2019 (71 मतदारसंघ)9 राज्यं
पाचवा टप्पा : 6 मे 2019 (51 मतदारसंघ)7 राज्यं
सहावा टप्पा : 12 मे 2019 (59 मतदारसंघ)7 राज्यं
सातवा टप्पा : 19 मे 2019 (59 मतदारसंघ )8 राज्यं
मतमोजणी : 23 मे 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
विश्व
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
