एक्स्प्लोर
अमित शाह उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार, उद्धव ठाकरे हजर राहणार
2014 मध्ये शिवसेना भाजपची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर तुळजापूरमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची तुलना अफजल खानाच्या फौजेसोबत केली होती.
मुंबई : भाजप अध्यक्ष अमित शाह यांची अफजल खानशी तुलना करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शाहांच्या लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करताना उपस्थित राहणार आहेत. अमित शाहांनी फोनवरुन दिलेलं निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलं आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह गांधीनगरमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यासाठी त्यांनी अर्ज भरण्याची तयारी सुरु केली आहे. उद्या म्हणजेच 30 एप्रिलला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
अर्ज दाखल करण्याआधी अमित शाह आपल्या मतदारसंघात रोड शो करुन शक्तीप्रदर्शन करणार आहेत. गांधीनगरच्या नारणपुरामधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करुन रोड शोला सुरुवात होईल. 4 किमी अंतराच्या या रोड शोमध्ये त्यांच्यासोबत भाजपचे माजी अध्यक्ष राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित असतील. यानंतर ते सभेला संबोधित करणार आहेत.
गांधीनगर हा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा पारंपरिक लोकसभा मतदारसंघ आहे. 1998 पासून ते इथून निवडून आले आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या जागेवर अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वयोमानामुळे लालकृष्ण अडवाणी अमित शाहांच्या रोड शोमध्ये सहभागी होणार नाही, असं भाजपच्या एका मंत्र्याने सांगितलं.
2014 मध्ये शिवसेना भाजपची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर तुळजापूरमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची तुलना अफजल खानाच्या फौजेसोबत केली होती. यानंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने वारंवार भाजप, अमित शाह आणि नरेंद्र मोदींवर जोरदार शाब्दिक प्रहार केले होते. मात्र आता त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना ते उपस्थित राहणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement