मोठी बातमी! मतमोजणीदरम्यान संभाजीनगरात गोंधळ, पोलिसांचा हस्तक्षेप; नेमकं कारण काय?
Chhatrapati Sambhajinagar Election Result : सध्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election Result : छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मात्र मतमोजणी चालू झाल्यानंतर पहिल्या काही मिनिटांमध्येच येथे गोंधळ झाला आहे. या गोंधळाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र गोंधळाची स्थिती निर्माण होताच, येथे पोलिसांनी हस्तक्षेप करत गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न केला.
...म्हणून मतमोजणी केंद्रावर गोंधळ
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका मतमोजणी केंद्रावर कॉलिंग एजंट यांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळेच येथे गोंधळ निर्माण झाला. दुसरीकडे मात्र कार्यकर्ते आतमध्ये जाण्यास आग्रही आग्रही आहेत. पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना आतमध्ये सोडण्यास नकार दिला. त्यामुळे येथे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पण शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत हा गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न केला.
संभाजीनगरातले उमेदवार नेमकं काय म्हणाले?
दरम्यान, आता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. प्रत्यक्ष मतमोजणी चालू होण्याआधी येथील प्रमुख उमेदवारांनी कोणत्याही स्थितीत माझाच विजय होणार असा विश्वास केला आहे. आम्ही निश्चिंत आहोत. या जागेवरून महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, असे मत शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते तथा महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार तथा शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीदेखील येथून माझाचा विजय होईल. संभाजीगरातल्या जनतेने मला साथ दिलेली आहे, असा विश्वास व्यक्त केला.
संभाजीनगरात तिहेरी लढत, कोण मारणार बाजी
सध्या छत्रपती संभाजीनगरात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या जागेवर तिहेरी लढत आहे. एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे, शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरे हे या जागेवरील प्रमुख उमेदवार आहेत. ही जागा जिंकण्यासाठी या तिन्ही उमेदवारांनी पूर्ण ताकद लावलेली आहे. त्यामुळे या जागेवर नेमकं काय घडणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा :