एक्स्प्लोर

पालघरचा युती-आघाडीचा उमेदवार अजूनही गुलदस्त्यात; मतदार, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम!

शिवसेना की भाजप या चर्चेला सध्या पूर्णविराम मिळाला असून त्याच्या जागी श्रीनिवास वनगा की राजेंद्र गावित, या चर्चेने जोर धरला आहे.

पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाआघाडीचा उमेदवार कोण असेल? या चर्चांना सध्या उधाण आलं असून शिवसेना आणि बविआ याबाबत लवकर निर्णय घेण्यासंदर्भात चालढकल करत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून विद्यमान भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे बविआच्या तिकीटावर रिंगणात असतील अशी चर्चा रंगली होत्या. तर सोमवारी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीनिवास वनगा याना डावलून गावित यांना सेनेच्या तिकीटावर उभे करण्याचे मनसुबे रचले जात असल्याचं वृत्त सर्वत्र पसरले आणि पुन्हा चर्चेला ऊत आलं आहे. परवा महाआघाडी झाल्यानंतर त्यांचा उमेदवार जाहीर होईल, असा अंदाज व्यक्त होत होता. परंतु बविआतर्फे अजूनही कोणतीही हालचाल झालेली नाही. बविआतर्फे माजी खासदार बलिराम जाधव, माजी आमदार मनीषा निमकर, राजेश पाटील ही नाव चर्चेत आहेत. येत्या 2 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. परंतु उमेदवार नक्की करण्यासंदर्भात शिवसेना आणि बविआ दिवसामागून दिवस पुढे ढकलत आहेत. त्यांच्या या रणनीतीमुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमावस्थेत आहेत. खासदार गावित यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याबाबत आपली प्रतिक्रिया दिल्यानंतरही त्यांच्याबाबत पसरत असलेल्या अफवांमुळे काय चाललंय ? अशा विवंचनेत कार्यकर्ते सापडले आहेत. मतदारसंघाचे प्रचंड क्षेत्र, 18 लाखाच्या आसपास असलेली मतदारसंख्या, हजारो गावं आणि लाखो पाडे, यामध्ये प्रचारयंत्रणा राबवणं, हे एक आव्हान असून ते पेलणारे स्थानिक पदाधिकारी आणि गावपाड्यातील कार्यकर्त्यांची अक्षरश: दमछाक होणार आहे. त्यामुळे उमेदवार लवकरात लवकर जाहीर करावा, अशी अपेक्षा ग्रामीण भागात व्यक्त होत आहे. परंतु त्यांच्या या अपेक्षेची वरिष्ठ, दखल घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कामास सुरुवात करण्यासाठी अद्याप एक आठवड्याचा कालावधी शिल्लक असल्यामुळे हे दोन्ही पक्ष आपले उमेदवार जाहीर करण्यासाठी किमान 3 ते 4 दिवस लावतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अशा या घडामोडीमुळे इच्छुक उमेदवारांचे मनोधैर्यही खच्ची होत आहे. दरम्यान शिवसेना की भाजप या चर्चेला सध्या पूर्णविराम मिळाला असून त्याच्या जागी श्रीनिवास वनगा की राजेंद्र गावित, या चर्चेने जोर धरला आहे. दुसरीकडे बविआचा कोण? हेही अद्याप गुलदस्त्यात असल्यामुळे दोन्ही कडून तोडीस तोड उमेदवार देण्याची प्रक्रिया सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nilesh Lanke On opponent : मतदारसंघात मतदानासाठी पैसे वाटप, लंकेचा विरोधकांवर आरोपRaosaheb Danve Jalna Vote :  पत्नीसह मतदान केंद्रात, रावसाहेब दानवेंनी बजावला मतदानाचा हक्कMurlidhar Mohol On Girish Bapat : गिरीश बापटांचं मताधिक्य मिळवण्याचा आमचा प्रयत्न : मोहोळMurlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Voting: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
Shah Rukh Khan : शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget