एक्स्प्लोर
Advertisement
कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीच्या कामाचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकाला धक्काबुक्की
राखीव शिक्षकांपैकी बऱ्याच शिक्षकांना प्रांताधिकाऱ्यांसोबत कामगिरी देण्यात आली होती. बहुतांश शिक्षकांना 22 आणि 23 एप्रिलला पूर्णवेळ रात्री अकरावाजेपर्यंत गडहिंग्लज इथे निवडणूक कार्यालयात थांबवण्यात आलं.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या कामाचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार कोल्हापुरातील गडहिंग्लजमध्ये घडला. निवडणुकीचं दिवसभर काम करुन घेतल्यानंतर, रात्री भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना 300 रुपये हातात ठेवून, उरलेला भत्ता बुडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रयत्न शिक्षकांनी हाणून पाडला. यावेळी शिक्षक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकारही घडला आहे. गडिंग्लज इथल्या निवडणूक कार्यालयात काल (23 एप्रिल) रात्री अकरा वाजता ही घटना घडली.
लोकसभा निवडणुकीसाठी काल पार पडलेल्या मतदानासाठी गडहिंग्लज शंभरहून जास्त शिक्षकांना राखीव ठेवलं होतं. राखीव शिक्षकांपैकी बऱ्याच शिक्षकांना प्रांताधिकाऱ्यांसोबत कामगिरी देण्यात आली होती. बहुतांश शिक्षकांना 22 आणि 23 एप्रिलला पूर्णवेळ रात्री अकरावाजेपर्यंत गडहिंग्लज इथे निवडणूक कार्यालयात थांबवण्यात आलं. निवडणूक कामकाज पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांनी दहा वाजता भत्ता मागितला. मात्र भत्ता देय नसल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. काही शिक्षक घरी निघून गेले, पण बऱ्याच शिक्षकांनी भत्त्याची मागणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या मागणीला प्रांताधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार यांनी कुठलीही दाद दिली नाही.
संताप अनावर झाल्यानंतर कॉम्रेड मिलिंद यादव आणि महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे यांचा पोलिसांसोबत वाद झाला. त्यातच धक्काबुक्कीचा प्रकार घडला. यावेळी सर्व शिक्षकांनी एकजूट दाखवून विरोध केला. त्याचबरोबर सर्व शिक्षकांनी प्रशासनाला देय असणारा नियमित भत्ता देण्याची मागणी केली. प्रांताधिकाऱ्यांनी 300 रुपये भत्ता देण्याचं जाहीर केले. पण शिक्षकांनी कडाडून विरोध केल्याने, प्रशासनाला सरकारच्या नियमानुसार भत्ता देणे भाग पडलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement