भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आठ तास बैठक, आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल रात्री पार पडली. बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची पहिली यादी आज संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. देशभरातील जवळपास 180 उमेदवारांचा या पहिल्या यादीत समावेश असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
![भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आठ तास बैठक, आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता lok sabha elections 2019 bjps election committee meeting undergoing first list may out today भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आठ तास बैठक, आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/17083017/Narendra-modi-amit-shah.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : लोकसभेसाठी उमेदवारांच्या नावावर चर्चेसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल शनिवारी रात्री पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जवळपास आठ तास ही बैठक चालली. मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ही बैठक सुरु होती.
बैठकीनंतर भाजपची पहिली यादी आज रविवारी संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. देशभरातील जवळपास 180 उमेदवारांचा या पहिल्या यादीत समावेश असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या यादीत पहिल्या टप्प्यात होणाऱ्या उमेदवारांची नावं असण्याची शक्यता आहे.
नागपुरातून नितीन गडकरी यांच्या उमेदवारीची घोषणा आज होऊन शकते. तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा हे देखील निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तसेच या निवडणुकीत सध्या भाजपचे खासदार असलेल्या अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
सातत्याने भाजपविरोधी बोलणारे शत्रुघ्न सिन्हा यांच्या जागी रविशंकर प्रसाद यांना पाटण्यातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. तर अरुणाचल प्रदेश पश्चिममधून किरण रिजीजू मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात शिवसेना-भाजप युतीकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. औरंगाबादमध्ये आज शिवसेना-भाजप युतीचा मेळावा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील युतीतील महत्त्वाचे नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यातही युतीच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)