एक्स्प्लोर

Lok Sabha Election Results 2024: पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीची उत्सुकता, पहिल्या तासातच लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा रागरंग कळणार

Maharashtra Politics: देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. थोड्याचवेळात मतमोजणीला सुरुवात होईल. सर्वप्रथम टपाली मतांची मोजणी केली जाईल. त्यावरुन प्राथमिक कल लक्षात येतील.

मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. प्रत्यक्ष मतमोजणी 8 वाजता सुरु होईल. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सर्वप्रथम पोस्टल मतांची (Postal Ballot) मोजणी सुरु होईल. सुरुवातीचा पाऊण ते तासभर पोस्टल मतांची मोजणी चालेल. यावरुन थेट लोकसभा निवडणुकीच्या निकाल (Lok Sabha Election Result 2024) कळणार नसला तरी राजकीय वारं नक्की कोणत्या दिशेला वाहत आहे, याचा अंदाज पोस्टल बॅलेटच्या मतांवरुन येऊ शकतो. त्यामुळे निकालाचे प्राथमिक कल कळून येतील. पोस्टल बॅलेटसची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम यंत्रांमधील मतांची मोजणी सुरु होईल.   प्रत्येक मतदारसंघात किती मतदान झालं आहे, त्यानुसार मतमोजणीच्या फेऱ्या होतील. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय 14 टेबलवर मतमोजणी होईल. म्हणजे प्रत्येक लोकसभेत एकूण 84 टेबलवर मतमोजणी होईल. 

राज्यात नेमकी कशी मतमोजणी होईल?

महाराष्ट्रात 48 जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. राज्यभरात 39 ठिकाणी 48 मतमोजणी केंद्रावर मतमोजणी होईल. यामध्ये पोस्टल बॅलेटच्या मतांचाही समावेश आहे.  महाराष्ट्रातील  48 मतदारसंघात 5 टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात एकूण 60.78 टक्के मतदानाची नोंद झाली. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात सर्वाधिक 63.71 टक्के मतदान झालं, तर दुसऱ्या टप्प्यात 62.71 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

85 वर्षांपुढील मतदारांची बॅलेट पेपर वरील मतदान : 54 हजार 649
अत्यावश्यक सेवेतील पोस्टल मतदान : 1 लाख 26 हजार 279
सीमेवरती असलेल्या सैनिकांचे मतदान : 75 हजार 970
एकूण पोस्टल मतदान : दोन लाख 56 हजार 898
पोस्टल मतदान मोजण्यासाठी अधिकारी : 601
ईव्हीएम मशीन वरील मतदान मोजण्यासाठी अधिकारी (AROs) : 288
ईव्हीएम वरील मतदान मोजण्यासाठी एकूण स्टाफ : 14,507
सैनिक आणि पोस्टल मतदान मोजण्यासाठी स्टाफ : 404
मतमोजणी करण्यासाठी इतर सहाय्यक अधिकारी : 567

पोस्टल बॅलेट म्हणजे काय असते?

पोस्टल बॅलेट म्हणजे टपालाद्वारे पाठवलेली मते असतात. पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे बॅलेट पेपरवर मतदान होत असे,तीच पद्धत पोस्टल बॅलेटसाठी वापरली जाते. जे मतदार त्यांच्या नोकरीमुळे आपल्या मतदारसंघात जाऊ शकत नाहीत, ते मतदार पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करतात. निवडणूक आयोग अगोदरच अशा मतदारांची संख्या निश्चित करुन त्यांना पोस्टल बॅलेट पाठवते. त्यानंतर मतदार आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करुन पोस्टल बॅलेट पोस्टाने किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने  निवडणूक अधिकाऱ्याकडे परत पाठवतो.

आणखी वाचा

माढ्याचा खासदार कोण? धैर्यशील मोहिते म्हणतात 80 हजारांनी जिंकणार, निंबाळकरांनाही मोदी करिष्म्यावर विश्वास  

मोदींची हॅट्रिक की इंडिया आघाडीची बाजी? देशात सत्ता कोणाची, मतमोजणीची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 1 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaMVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Mumbai Crime News : क्षुल्लक कारणावरुन वादाची ठिणगी, 80 वर्षीय बापानं लेकाला संपवलं, दादरमध्ये धक्कादायक प्रकार
क्षुल्लक कारणावरुन वाद, बापानं लेकाला संपवलं, मुंबईतील दादरमध्ये खळबळजनक घटना
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
Embed widget