Devendra Fadnavis : विधानसभेत 20-20 खेळलो आणि विश्वचषक जिंकलो
नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी काही विषयांवर बोलताना जोरदार फटकेबाजी केली. लोकसभेनंतर टी-२० मॅच खेळली. आता टेस्ट मॅच सुरू झाली असून ती जिंकण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसंच शरद पवारांच्या कारकीर्दीशी होणाऱ्या तुलनेवर देखील त्यांन प्रतिक्रिया दिलीय. पाहुयात फडणवीस नेमकं काय म्हणाले ते..
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
Nagpur News: गडचिरोलीमधून अशी मागणी आहे की जिल्ह्याचे पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावे. जेव्हा मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्री होतात, तेव्हा तिथल्या विकासाला गती मिळते. गडचिरोलीमधून तशी मागणी होत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारावे. असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी देलेल्या चॉइस संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले होते की, पालकमंत्र्याच्या संदर्भात आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल, त्यांनी मला बीडला जायला सांगितलं तर मी बीडला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल. साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात. पण माझी स्वतःची इच्छा आहे, गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो, अर्थात या तीन नेत्यांनी मान्यता दिली तरच मी ते ठेवेन, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होते. याच मुद्यांवर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्रीपदे आणि खाते यांच्यासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती, तशीच रस्सीखेच आता देखील पालकमंत्रिपदासाठी पाहायला मिळत आहे. 36 पैकी 11 जिल्ह्यात ही रस्सीखेच जरा जास्तच तीव्र असल्याचं दिसत आहे. पुणे, रायगड, नाशिक, संभाजीनगर, बीड, सातारा हे जिल्हे पालकमंत्रिपदासाठी प्रतिष्ठेचे बनले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा केल्याने याचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार असल्याच्या चर्चा होत्या. आता तिन्ही पक्षातील मंत्र्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्यावरून रस्सीखेच सुरू झाली असल्याचे चित्र आहे. अशातच भाजपच्या गोटातून यावर भाष्य करण्यात आले आहे.