New Delhi Lok Sabha Election Result : नवी दिल्लीत भाजपचा 7 जागांवर दणदणीत विजय, आप अन् काँग्रेसची पाटी कोरी
New Delhi Lok Sabha Election Result : नवी दिल्लीतीव भाजपच्या उमेदवारींनी सर्वच्या सर्व 7 जागांवर विजय मिळवला आहे. आप आणि काँग्रेसला नवी दिल्लीत पराभव स्वीकारावा लागला.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल (Lok Sabha Election Result) जाहीर होत आहेत. भाजपला (BJP) मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि नवी दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये एकतर्फी विजय मिळाला. राजधानी नवी दिल्लीमध्ये (New Delhi) भाजपनं गेल्या निवडणुकीप्रमाणं सर्वच्या सर्व 7 जागांवर विजय मिळवला आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी जामिनावर बाहेर येऊन प्रचार केल्यानंतरही आप आणि काँग्रेसला फायदा होताना दिसला नाही. भाजपनं नवी दिल्लीतील सात जागांवर विजय मिळवला आहे.
नवी दिल्ली पुन्हा एकदा भाजपकडे
नवी दिल्लीतील सात लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला. चांदणी चौक लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रवीण खंडेलवाल यांनी काँग्रेसच्या जय प्रकाश अग्रवाल यांना पराभूत केलं. उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपच्या मनोज तिवारी यांनी काँग्रेसच्या कन्हैय्या कुमार यांचा पराभव झाला.
दिल्ली पूर्व लोकसभा मतदारसंघात भाजपच्या हर्ष मल्होत्रा यांनी विजय मिळवला.त्यांनी आम आदमी पार्टीच्या कुलदीप कुमार यांना पराभूत केलं.
नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपच्या बांसुरी स्वराज यांनी विजय मिळवला. बांसुरी स्वराज यांनी आम आदमी पार्टीच्या सोमनाथ भारती यांना पराभूत केलं.
उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपचे योगेंद्र चंदोलिया विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उदित राज यांना पराभूत केलं.
पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपच्या कमलजीत सेहरावत यांनी आम आदमी पार्टीचे महाबल मिश्रा यांना पराभूत केलं.
नवी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण प्रकरणी ईडीनं अटक केली होती. या अटकेच्या कारवाईनंतर अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टातून जामीन मिळवत प्रचार केला होता. मात्र, अरविंद केजरीवाल यांच्या प्रचाराचा आपला फायदा झाल्याचं दिसून आलं नाही. आपला दिल्लीत एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.
विधानसभा, महापालिकेला आप तर लोकसभेला दिल्लीकरांचा कौल भाजप
नवी दिल्लीतील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत आणि दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीला विजयी केलं होतं. मात्र, लोकसभा निवडणुकीत गेल्या वेळी प्रमाणं यावेळी देखील दिल्लीच्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी केलं.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. देशात एनडीए 270 जागांवर आघाडीवर आहे. तर, इंडिया आघाडी 251 जागांवर आघाडीवर आहेत.
संबंधित बातम्या :
Beed Loksabha : बजरंग बप्पांनी बाजी मारली, बीडच्या हायहोल्टेज लढतीत पंकजा मुंडेंचा पराभव
परभणीत 100 कोटींची उलाढाल, पण उपयोग नाहीच; बंडू जाधवांचा टोला, विजयी मिरवणुकीत झळकले जरांगेंचे बॅनर