एक्स्प्लोर

Beed Loksabha : बजरंग बप्पांनी बाजी मारली, बीडच्या हायहोल्टेज लढतीत पंकजा मुंडे यांचा पराभव

Beed Loksabha : बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली. त्यामुळे भाजप उमेदवार पंकजा मुंडे पिछाडीवर पडताना दिसत आहेत.

Beed Loksabha : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी 7 हजार मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला आहे.. त्यामुळे हायहोल्टेज लढतीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर महत्वाचा मानला गेला. आता केवळ सहा मतदान यंत्र मतदान यंत्र मोजणे बाकी होती. त्यामध्येही बजरंग सोनवणेंनी बाजी मारली आहे. दिवसभर अटीतटीची लढत सुरु असताना शेवटच्या फेरीत बजरंग सोनवणेंनी विजय मिळवलाय. 

पंकजा मुंडेंकडून बीड , गेवराई विधानसभा मतदारसंघात फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. 

भाजप उमेदवार पंकजा मुंडेंकडून बीड , गेवराई विधानसभा मतदारसंघात फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. बीड लोकसभा मतदारसंघात अतिशय अटीतटीच्या लढतीत 32 व्या फेरीमध्ये निकाल समोर आला होता. 31 व्या फेरीनंतर पंकजा मुंडे 400 मतांनी आघाडीवर होत्या. मात्र, शेवटच्या फेरीपर्यंत बीडमध्ये ट्वीस्टवर ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत.  पंकजा मुंडे यांनी 34 हजारांचा लीड घेतला होता. तो बजरंग सोनवणे यांनी 4 ते 5 फेऱ्यांमध्ये मोडित काढला होता. आज सकाळपासूनच बीडमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत होता. बीड लोकसभा मतदारसंघ मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणामुळे अतिशय संवेदनशील बनला होता. प्रत्येक फेरीत आघाडी घेणारा उमेदवार बदलत होता. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वांत अटीतटीची लढत बीड लोकसभेत पाहायला मिळाली. 

बीड लोकसभा मतदार संघात कोण कोणत्या फेरीत आघाडीवर ?

पहिली फेरी - बंजरंग सोनवणे 1359 मतांनी आघाडीवर

दुसरी फेरी - बजरंग सोनवणे 2349 मतांनी आघाडीवर  

सहावी फेरी - बजरंग सोनवणे 1387 मतांनी आघाडीवर 

सातवी फेरी - बजरंग सोनवणे 203 मतांनी आघाडीवर 

दहावी फेरी - पंकजा मुंडे 11955 मतांनी आघाडीवर

11 वी फेरी - पंकजा मुंडे 2111 मतांनी आघाडीवर

12 वी फेरी - बजरंग सोनवणे 1644 मतांनी आघाडीवर 

13 वी फेरी - बजरंग सोनवणे 6473 मतांनी आघाडीवर

15 वी फेरी - पंकजा मुंडे 3093 मतांनी आघाडीवर 

18 वी फेरी - पंकजा मुंडे 24099 मतांनी आघाडीवर 

19 वी फेरी - पंकजा मुंडे 24361 मतांनी आघाडीवर 

20 वी फेरी - पंकजा मुंडे 16482 मतांनी आघाडीवर 

21 वी फेरी - पंकजा मुंडे 33623 मतांनी आघाडीवर

22 वी फेरी - पंकजा मुंडे 38303 मतांनी आघाडीवर 

23 वी फेरी - पंकजा मुंडे 34705 मतांनी आघाडीवर 

24 वी फेरी - पंकजा मुंडे 30461 मतांनी आघाडीवर 

25 वी फेरी - पंकजा मुंडे 22421 मतांनी आघाडीवर 

26 वी फेरी - पंकजा मुंडे 10276 मतांनी आघाडीवर

27 वी फेरी - पंकजा मुंडे 7408 मतांनी आघाडीवर 

28 वी फेरी - बजरंग सोनवणे 932 मतांनी आघाडीवर 

29 वी फेरी - बजरंग सोनवणे 1217 मतांनी आघाडीवर

30 वी फेरी - बजरंग सोनवणे 2602 मतांनी आघाडीवर

31 वी फेरी - बजरंग सोनवणे 2688 मतांनी आघाडीवर

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपने प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करत पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवले होते. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना आपल्या पक्षात खेचत उमेदवारी दिली होती. बीड लोकसभेत मतमोजणीच्या एक दिवसापूर्वी वातावरण चांगलच तापलेलं पाहायला मिळालं होतं. बजरंग सोनवणे येथे थेट निवडणूक अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली होती. 

बीडमध्ये सोनवणे वि. मुंडे अटीतटीची लढत 

बीड लोकसभा मतादरसंघातील लढत ही अत्यंत महत्वपूर्ण मानली जात होती. कारण या मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या होत्या. तर बजरंग सोनवणे यांच्यासाठी देखील शरद पवारांनी ताकद लावली होती. त्यामुळं ही लढत अत्यंत तुल्यबळ मानली जात आहे.  

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला 

बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वांत तापलेला पाहायला मिळाला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आणि मनोज जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यातील अनेक जागांवर भाजपला पराभव स्वीकारावा लागल्याच्या चर्चा आहेत. बीडमध्ये लोकसभा निवडणूकीत सर्वांत मोठा परिणाम झाल्याचे बोलले गेले. ओबीसी विरुद्ध मराठा वादाने या मतदारसंघात जोर धरला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

बीड लोकसभेत मतमोजणीच्या एक दिवसापूर्वी वातावरण चांगलच तापलेलं पाहायला मिळालं होतं. बजरंग सोनवणे येथे थेट निवडणूक अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget