(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lok Sabha Election Phase 1: लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य 'मतपेटीत' होणार बंद
Lok Sabha Election Phase 1: नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया या पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. या पाचही ठिकाणी महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी थेट लढत होत आहे.
Lok Sabha Election Phase 1: लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) पहिल्या टप्प्याचं मतदान होतंय. 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान होतंय, एकूण 102 मतदारसंघात आज मतदार आपला मतदानाचं परम कर्तव्य बजावतील. राज्याचा विचार केला तर आज पूर्व विदर्भात पाच मतदारसंघात मतदान होतंय. नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. या पाचही ठिकाणी महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी थेट लढत होतेय. यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे रिंगणात आहेत.
तर उत्तर प्रदेशातील 8, राजस्थानातील 13, मध्य प्रदेशातील सहा, आसाममधील पाच, बिहारमधील चार, महाराष्ट्रातील पाच, जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एक, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमधील प्रत्येकी दोन, त्रिपुरामधून एक, उत्तराखंडमधील सहा, तामिळनाडूमध्ये 39, पश्चिम बंगाल, सिक्कीम, नागालँड, अंदमान आणि निकोबार, मिझोराम, पुडुचेरी, मणिपूर आणि लक्षद्वीपमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील देखील काही मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, रामटेक आणि नागपूर या मतदारसंघाचा समावेश आहे. गडचिरोली सोडून इतर ठिकाणी आज सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजे दरम्यान मतदान होणार आहे. तर गडचिरोलीत सकाळी 7 ते 3 वेळेत मतदान होणार आगे.
पहिल्या टप्प्यातील लढती
- नागपूर - नितीन गडकरी (भाजप) वि. विकास ठाकरे (काँग्रेस)
- चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार (भाजप) वि. प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)
- रामटेक - राजू पारवे (शिंदे गट) वि. श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)
- भंडारा गोंदिया - सुनील मेंढे (भाजप) वि. प्रशांत पडोळे (काँग्रेस)
- गडचिरोली-चिमूर - अशोक नेते (भाजप) वि. नामदेव किरसान (काँग्रेस)
प्रत्येक मतदान केंद्रावर मॉक पोल
सात वाजता मतदानाची प्रक्रिया सुरु होण्याआधी प्रत्येक मतदान केंद्रावर मॉक पोल केलं जात आहे. ईव्हीएम अचूक पद्धतीने काम करत आहे की नाही याची चाचणी याद्वारे घेतली जात आहे. मॉक पोलमध्ये प्रत्येक उमेदवाराला दोन वेळेला मतदान करुन तो मतदान त्याच्याच नावाने नोंदवला जात आहे की नाही हे तपासले जाते.नागपूरमध्ये 27 उमेदवार असल्याने प्रत्येक उमेदवाराला दोन याप्रमाणे मॉक पोलमध्ये 54 मतं टाकली जात आहे. त्याची नोंद संबंधित उमेदवाराच्या समोर होत आहे की नाही हे तपासले जात आहे.
प्रशासन सज्ज
चंद्रपूरच्या आर्णी लोकसभा मतदार संघासाठी सकाळी 7 वाजता पासून मतदानाला सुरुवात होणार असून प्रशासन यासाठी सज्ज झाले आहे. आर्णी येथील युवा आदर्श मतदान केंद्र मतदानासाठी सजविण्यात आले आहे. चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदार संघात यवतमाळच्या आर्णी आणि वणी या दोन मतदार संघाचा समावेश आहे. निवडणूक विभागाकडून मतदान सुरू होण्यापूर्वी मॉक पोल करण्यात येत आहे.
हे ही वाचा :