ईशान्य मुंबईसाठी ठाकरेंचा नवा शिलेदार मैदानात, माजी खासदार संजय पाटलांना उमेदवारी जाहीर
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी मतदार मोठ्या संख्येनं आहेत. ठाकरेंनी नवा शिलेदार मैदानात उतरवल्याचं बोललं जात आहे.
![ईशान्य मुंबईसाठी ठाकरेंचा नवा शिलेदार मैदानात, माजी खासदार संजय पाटलांना उमेदवारी जाहीर Lok Sabha Election Former Mp Sanjay Patil Candidature Announced North East Mumbai Constituency Shiv Sena Thackeray Vs BJP Manoj Kotak ईशान्य मुंबईसाठी ठाकरेंचा नवा शिलेदार मैदानात, माजी खासदार संजय पाटलांना उमेदवारी जाहीर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/27/64a18d3ff5a719de07cfd703ec8e3953170104957284089_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच यंदाची निवडणूक (Elections) भाजप (BJP) विरोधात स्थापन झालेली महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीत (NCP) फूट पडून स्थापन झालेली महायुती यामुळे अत्यंत चुरशीची ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडूनही जोरदार तयारी करण्यात येत आहे. ठिकठिकाणी सभा, जाहीर मेळावे घेण्यात येत आहे.. भांडुपमध्ये काल ठाकरे गटाच्यावतीने ईशान्य मुंबईतील (North-East Mumbai Constituency) कोकणवासीयांचा जाहीर मेळावा पार पडला. या वेळी ईशान्य मुंबईची जागा ही शिवसेना ठाकरे गट लढेल आणि माजी खासदार संजय पाटील (Sanjay Dina Patil) हे उमेदवार असतील अशी घोषणा या वेळी खासदार विनायक राऊत यांनी केलेय
लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना आता मुंबई उपनगरात शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचाराचे बिगूल वाजलं आहे. भांडुपमध्ये ईशान्य मुंबईतील कोकणवासीयांचा जाहीर मेळावा पार पडला. या मेळाव्याला शिवसेना नेते खासदार विनायक राऊत हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तर शिवसेना नेते आदेश बांदेकर, आमदार रमेश कारगावकर आणि अन्य नेते उपस्थित होते.या वेळी ईशान्य मुंबईची जागा ही शिवसेना ठाकरे गट लढेल आणि माजी खासदार संजय पाटील हे उमेदवार असतील अशी घोषणा या वेळी खासदार विनायक राऊत यांनी या वेळी केली. शिंदे गटात गेलेले कोकणातील नेते आणि राणे पिता पुत्रावर ही त्यानी जोरदार टीका केली. तर शिवसेना ठाकरे गट लोकसभेत कोकणात आणि मुंबईत यश मिळवेल अशी आशा त्यानी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून ठाकरेंच्या शिवसेनेत
ईशान्य मुंबईत सध्याचे ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या नावाचीही चर्चा होती. संजय राऊत यंदा लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु, आता सुनील राऊतांनी या चर्चांना पूर्णविराम देत संजय दीना पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. संजय दीना पाटील हे 2004 साली आमदार राहिले आहेत तर 2009 ला खासदार होते. तसेच, काही वर्षांपूर्वी संजय दीना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.
ईशान्य मुंबईसाठी ठाकरेंचा नवा शिलेदार मैदानात
ईशान्य मुंबई लोकसभेची जागा ही सेना भाजप युतीमध्ये भाजपसाठी देण्यात आली होती. जिथे भाजपचे खासदार मनोज कोटक आहेत. त्यांच्याविरोधात तगडा उमेदवाराच्या शोधात ठाकरे गट गेल्या अनेक दिवसांपासून होता. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी मतदार मोठ्या संख्येनं आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या नावाची देखील चर्चा लोकसभेच्या उमेदवारीसाठी होती. मात्र यावर कुठलाही निर्णय घेण्यात आला नव्हता. पण आता राऊतांच्या चर्चांना पूर्णविराम देत ठाकरेंनी नवा शिलेदार मैदानात उतरवल्याचं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)