मोठी बातमी : शिंदेंचे 4, अजित पवारांच्या एका खासदाराचं मन वळवण्याचा प्रयत्न, इंडिया आघाडी सत्तेसाठी ॲक्शन मोडमध्ये!
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत भाजप तसेच सत्ताधारी इंडिया आघाडीला अपेक्षित यश मिळालेलं नाही. दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे.
नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election Result 2024) भाजपप्रणित एनडीएला (NDA) अपेक्षित यश मिळालेलं नाही. एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास भाजपकडून (BJP) व्यक्त केला जात होता. पण प्रत्यक्ष एनडीएला 300 चा आकडा गाठता आलेला नाही. दरम्यान आता दिल्लीमध्ये सत्तास्थापनेसाठी हालचाली चालू झाल्या आहेत. देशात आम्हीच सत्ता स्थापन करू अशा दावा एनडीएकडून केला जातोय. तर दुसरीकडून इंडिया आघाडीतही (INDIA Alliance) घडामोडींना वेग आला आहे.
सत्तास्थापनेचं गणित काय असणार?
सूत्रांच्या माहितीनुसार नितीश कुमार यांना पंतप्रधानपद देण्याचे मान्य झाल्यास चिराग पासवान तसेच जितनराम मांझी हे इंडिया आघाडीसोबत येण्यावर विचार करू शकतात.सध्या नितीश कुमार यांच्या पक्षाचे 12 खासदार आहे. जितनराम मांझी आणि चिराग पासवान यांच्या खासदारांची संख्या ही अनुक्रमे 1 आणि 5 आहे. या तिघांच्याही खासदारांची एकूण संख्या 18 वर पोहोचते.
...तर आणखी चार खासदार सोबत येतील
दुसरीकडे महाराष्ट्रातही एकनाथ शिंदे यांच्या चार तर अजित पवार यांच्या एका खासदाराचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. तसे झाल्यास महाराष्ट्रातून इंडिया आघाडीला अतिरिक्त पाच खासदारांचं मिळेल. पप्पू यादव, विशाल पाटील तसेच लडाख आणि दमन दीव येथील खासदारांनीही इंडिया आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास विरोधकांना आणखी 4 खासदार मिळतील.
बीजेडी, एमआयएम, YSR चीही गरज
एकूणच इंडिया आघाडीचे 234 आणि वर नमूद केलेले एकूण 27 खासदार एकत्र झाले तर हा आकडा 261 वर पोहोचतो. सरकार स्थापन करण्यासाठी 272 खासदारांची गरज आहे. त्यामुळे बीजेडी, एमआयएम, वायएसआर यासारख्या छोट्या पक्षांनीही इंडिया आघाडीला पाठिंबा दिल्यास इंडिया आघाडीतील खासदारांची संख्या 272 पर्यंत जाऊ शकते.
...तर चंद्राबाबू नायडू सोबत येऊ शकतील
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिल्यास चंद्राबाबू नायडूदेखील इंडिया आघाडीसोबत येण्यावर विचार करू शकतील, अशी इंडिया आघाडीला अपेक्षा आहे. या सर्व गोष्टी जुळून आल्यास देशात इंडिया आघाडीचे सरकार येऊ शकते.
हेही वाचा :
NDA ला धक्का देऊन, I.N.D.I.A मध्ये सहभागी होणार चंद्राबाबू नायडू? स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
Sharad Pawar: नितीश कुमारांना पंतप्रधानपदाच्या ऑफरची चर्चा, शरद पवार सत्तास्थापनेबाबत काय म्हणाले?