एक्स्प्लोर

देशातील 29 राज्य अन् 7 केंद्रशासित प्रदेशात कोणाला किती जागा, भाजपच्या कुठे घटल्या; देशाचा A टू Z निकाल

लोकसभा निवडणकीत यंदा भाजपची पिछेहाट झाली असून गत 2019 च्या निवडणुकांपैकी 63 जागा घटल्या आहेत. तर, आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पक्षाने मोठी आघाडी घेत 16 जागांवर विजय मिळवला आहे

नवी दिल्ली : देशातील राज्य राज्य 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशातील एकूण 36 ठिकाणी झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाची अंतिम आकडेवारी आता समोर आली आहे. त्यामध्ये, भाजप (BJP) प्रणित एनडीए आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्या असून भाजपा 240 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर, काँग्रेस (Congress) 99 जागांसह द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला असून इंडिया आघाडीत (India alliance) सर्वाधिक जागा घेणारा पक्ष काँग्रेस ठरला आहे.  देशातील सर्वात मोठ्या 5 राजकीय पक्षांचा विचार केल्यास, समाजवादी पार्टी 37 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस 29 जागांसह 4 थ्या क्रमांकावर आहे. या यादीत तामिळनाडूतील डीएमके पक्ष 22 जागांसह 5 व्या क्रमांकावर आहे. 

लोकसभा निवडणकीत यंदा भाजपची पिछेहाट झाली असून गत 2019 च्या निवडणुकांपैकी 63 जागा घटल्या आहेत. तर, आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पक्षाने मोठी आघाडी घेत 16 जागांवर विजय मिळवला आहे. इंडिया आघाडीला बहुमत न मिळाल्याने मोदींच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने तिसऱ्यांदा सरकार स्थापनेचा दावा केला आहे. एनडीए आघाडीला 294 जागांवर विजय मिळाला असून इंडिया आघाडीला 232 जागांवर विजय मिळाला आहे. तर, अपक्षांसह इतर 17 उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यामुळे, भाजपप्रणित एनडीए आघाडीकडून सत्ता स्थापन करण्यात येईल. तर, 10 जूनपर्यंत नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदाचा शपथविधी पार पडेल, असेही सांगण्यात येत आहे. 

देशातील विविध राज्यातील संख्याबळ

.उत्तर प्रदेश - 80

समाजवादी -37
भाजप - 33
काँग्रेस - 6
राष्ट्रीय लोक दल - 2
आझाद समाज पार्टी - 1
अपना दल - 1     

.महाराष्ट्र - 48

काँग्रेस - 13
भाजपा - 9
शिवसेना ठाकरे - 9
राष्ट्रवादी शरद पवार - 8
शिवसेना शिंदे - 7
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार - 1
अपक्ष - 1

.पश्चिम बंगाल - 42

तृणमूल काँग्रेस - 29
भाजप - 12
काँग्रेस - 1

.मध्य प्रदेश - 29

भाजपा - 29 (सर्वच)

.राजस्थान - 25

भाजप - 14
काँग्रेस - 8
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) - 1
राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी - 1
भारतीय आदिवासी पार्टी - 1 

.गुजरात - 26

भाजपा - 25
काँग्रेस -1

.बिहार - 40

जयदू - 12
भाजप - 12
लोकजनशक्ती - 5
राष्ट्रीय जनता दल - 4
काँग्रेस - 3
कम्युनिस्ट पार्टी ( मार्क्सवादी) - 2
हिंदुस्तानी आवाम मोर्चा - 1
अपक्ष - 1

.कर्नाटक - 28

भाजप - 17
काँग्रेस - 9
जनता दल - 2

.तामिळनाडू - 37

डीएमके - 22
काँग्रेस - 9
विसीके - 2
कम्युनिस्ट पार्टी - 2
एमडीएमके - 1
भारतीय केंद्रीय मुस्लीम लीग - 1

.केरळ - 20

काँग्रेस - 14
आययुएमएल -2
कम्युनिस्ट पार्टी - 1
भाजप - 1
केरळ काँग्रेस - 1
आरएसपी - 1 

.आंध्र प्रदेश - 25

तेलुगू देसम - 16
वायएसआरसीपी - 4
भाजच - 3
जनसेना - 2

.तेलंगणा - 17

भाजप -8
काँग्रेस - 8
एमआयएम - 1

.पंजाब - 13

काँग्रेस - 7
आप - 3
शिरोमणी अकाली दल - 1
अपक्ष - 2

.हरयाणा - 10

काँग्रेस - 5
भाजप - 5

.झारखंड - 14

भाजप - 8
झारखंड मुक्ती मोर्चा - 3
काँग्रेस - 2
एजेएसयुपी - 1

.हिमाचल प्रदेश -4

भाजप - 4

.अरुणाचल प्रदेश - 2

भाजप - 2

.आसाम - 14

भाजप - 9
काँग्रेस - 3
युपीपीएल - 1
एजीपी - 1

.मेघायल - 2

व्हीओटीपीपी - 1
काँग्रेस - 1

.मिझोरम - 1

झेडपीएम - 1

.नागालँड - 1

काँग्रेस - 1

.मणिपूर - 2

काँग्रेस - 2

.छत्तीसगड - 11

भाजप - 10
काँग्रेस - 1

.गोवा - 2

भाजप - 1
काँग्रेस - 1

.उत्तराखंड - 5

भाजप - 5

.त्रिपुरा - 2

भाजप - 2

.ओडिशा - 21

भाजप - 20
काँग्रेस - 1

. सिक्कीम - 1

सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा - 1

केंद्रशासित प्रदेश

.जम्मू काश्मीर - 6

जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स - 2
भाजप - 2
अपक्ष- 2

.लडाख - 1

अपक्ष - 1

.लक्षद्वीप - 1

काँग्रेस - 1

. दिल्ली - 7

भाजप - 7

. पाँडेचरी - 1

काँग्रेस - 1.

.अंदमान निकोबार  - 1    

भाजप 1

. दादरा नगर हवेली आणि दिव-दमण - 2

भाजप - 1
अपक्षा - 1

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget