एक्स्प्लोर

India Tv CNX Survey: भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार? विरोधकांच्या INDIA ला किती जागा मिळणार? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष

Lok Sabha Election 2024: NDA आणि INDIA या दोन मोठ्या आघाड्यांपैकी कोण पुढे? आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर सरकार कोण स्थापन करणार? कोणाला किती जागा मिळणार? पाहा सर्वेक्षणाचा निष्कर्ष...

NDA-INDIA Lok Sabha Seat Opinion Poll: लोकसभा निवडणुकीच्या 2024 (Lok Sabha Election 2024) च्या महायुद्धासाठी दोन आघाड्यांनी तयारी सुरू केली आहे. 7 महिन्यांनी होणाऱ्या संभाव्य निवडणुकीबाबत जनतेमध्येही उत्साह असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, त्यांच्या मनात अनेक प्रश्नही आहेत. आगामी लोकसभा निवडणूक आज झाली तर देशात सरकार कोण बनवणार? कोणत्या युतीचा फायदा होईल, कोणाला तोटा होईल? याचा अंदाज एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वेक्षणाचा निष्कर्ष समोर आला आहे. जाणून घेऊया जनतेचा कौल नक्की कोणाच्या बाजूनं आहे, हे सविस्तर... 

आगामी निवडणुकीत लोकांचा कल पाहण्यासाठी इंडिया टीव्ही सीएनएक्सनं हे सर्वेक्षण केलं आहे. निष्कर्षानुसार, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला बहुमत मिळण्याची अपेक्षा आहे. तर विरोधकांची आघाडी असलेली इंडिया मात्र सत्तेपासून खूपच दूर असल्याचं दिसत आहे. दरम्यान, निष्कर्षातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, 2019 च्या तुलनेत एनडीए आणि भाजपला काही जागा कमी मिळू शकतात. तर पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे.

भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार?

सर्वेक्षणाच्या निकालांनुसार, लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी एनडीएला 318 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत एनडीएच्या जागांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत एनडीएला 353 जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत एनडीएला 35 जागा कमी होऊ शकतात.

2019 च्या लोकसभा निवडणुकीनुसार, 13 जागा कमी पडून 2024 मध्ये भाजपला 290 जागा मिळतील असा अंदाज आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपनं एकूण 303 जागा जिंकल्या होत्या. यावरून भाजप स्वबळावर पुढील वर्षी केंद्रात सत्ता मिळवू शकतं, असा खुलासा निष्कर्षातून करण्यात आला आहे. 

वोट शेयर 

भाजप (BJP) : 42.5 टक्के 
एनडीए (NDA) : 57.5 टक्के
इंडिया (INDIA) : 24.9 टक्के
इतर : 32.6 टक्के

विरोधकांच्या INDIA ला किती जागा मिळतील?

भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीला सत्तेतून बेदखल करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विरोधकांच्या इंडिया अलायन्सला सर्वेक्षणात 175 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, इंडिया केंद्रात सरकार स्थापन करू शकणार नाही. एकट्या काँग्रेसबद्दल बोलायचं झालं तर देशातील सर्वात जुन्या पक्षाला 66 जागा मिळण्याची शक्यता आहे. 2019 च्या तुलनेत, काँग्रेसला 14 जागा जास्त मिळू शकतात, गेल्या निवडणुकीत पक्षाला 52 जागा मिळाल्या होत्या. सर्वेक्षणात इतरांना एकूण 50 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

The Daily Guardian Survey: शिवसेना खासदाराच्या मतदार संघात सर्वेक्षण, जनता म्हणतेय, मोदींच्या नावावर देणार मतं; निष्कर्ष काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्लाUddhav Thackeray : सत्तारांची गुंडगिरी मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget