एक्स्प्लोर

Laxman Hake Car Attacked : मोठी बातमी, लक्ष्मण हाके यांची कार अडवली, काचा फोडल्या, नांदेडच्या बाचोटी गावातील घटना

Laxman Hake Car Attack : ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची गाडी नांदेडच्या बाचोटी गावात फोडण्यात आल्याची घटना घडलीय.

नांदेड : ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची गाडी फोडण्यात आल्याची घटना घडली आहे. लक्ष्मण हाके यांच्या कारच्या मागच्या बाजूच्या काच फोडण्यातं आल्याचं दिसून आलं. नांदेड जिल्ह्यातील  कंधार तालुक्यातील बाचोटी इथे हा प्रकार घडल्याची माहिती आहे.  बाचोटी येथून जात असताना काही जणांनी तोंड बांधून हल्ला केला असल्याची लक्ष्मण हाके यांनी दिली. ओबीसींनी त्यांच्या हक्कांचं रक्षण करायचं नाही का, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला. आमच्या गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला, असं हाके यांनी म्हटलं. 

लक्ष्मण हाके यांनी याप्रकारासंदर्भात बोलताना हा हल्ला भ्याड आणि जीवघेणा हल्ला असल्याचं म्हटलं. आमचा जीव घेऊन कुणाचं ध्येय साध्य करायचं असेल तर तयार आहोत, असं हाके म्हणाले.  आमने सामने यायची हल्लेखोरांमध्ये धमक नाही. यांच्यात समोरासमोर येऊन लढायचा दम नाही. बाचोटी गावातील तरुण होते, त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. जरांगेंच्या नावानं घोषणा देत होते. आता निवडणुकीतून माघार घ्यायची का? उद्या आम्हाला मतदानाला बाहेर पडू दिलं जाणार की नाही, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला. कंधार तालुक्यातील पोलिसांना माहिती देऊनही वाय दर्जाची सुरक्षा असूनही एक कॉन्स्टेबल नव्हता, असं लक्ष्मण हाके म्हणाले. लातूरमध्ये पोलिसांनी संरक्षण दिलं होतं, नांदेडमध्ये एकही पोलीस संरक्षणाला नव्हता, असं लक्ष्मण हाके म्हणाले. आमच्या गाड्या त्या गावातून पास होत असताना गाड्या अडवण्यात आल्या, असं हाके म्हणाले. उद्या कंधार पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार आहोत, असंही ते म्हणाले. हल्लेखोरांना अटक होईपर्यंत कंधार पोलीस स्टेशनजवळ ठिय्या आंदोलन करणार आहोत, असं लक्ष्मण हाके म्हणाले.

लोहा मतदारसंघातील जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन पाटील त्यांच्या प्रचारासाठी लक्ष्मण हाके आले  होते. प्रचारसभा संपवून परत जाताना बाचोटी येथे हा प्रकार घडला. शंभर ते दीडशे तरुणांचा जमाव होता, पहिल्यांदा गाडीच्या बोनेटवर चढले आणि त्यानंतर गाडीच्या मागच्या बाजूच्या काचा फोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली. हल्ला करणाऱ्यांच्या हातामध्ये काळे झेंडे होते. हल्लेखोर एक मराठा लाख मराठा आणि मनोज जरांगेंच्या नावाच्या घोषणा दिल्या, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं.  हाके यांची गाडी अडवून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या जात होत्या.  त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी आंदोलक  देखील आक्रमक झाले . त्यांनी देखील घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. ओबीसी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या करून घोषणा दिल्या. नंतर पोलिसांनी मध्यस्थी करून  वाद शमवला, अशी माहिती आहे. 

इतर बातम्या :

भाजप विरोधातील बंडखोरीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवाराचा गौप्यस्फोट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझाHingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Embed widget