एक्स्प्लोर

भाजप विरोधातील बंडखोरीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवाराचा गौप्यस्फोट

वाशिम विधानसभा मतदारसंघात शिवसेने शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार संजय आधारवाडे (Sanjay Aadharwade) यांनी भाजपच्या उमेदवारच्या विरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Washim Maharashtra Assembly Election : वाशिम  (Washim) जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार भावना गवळी (Bhavna Gawli) यांच्या विरोधात भाजप नेते अनंतराव देशमुख (Anantrao Deshmukh) यांनी बंडखोरी केली आहे. भावना गवळी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं वाशिम विधानसभा मतदारसंघात शिवसेने शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार संजय आधारवाडे (Sanjay Aadharwade) यांनी भाजपच्या उमेदवारच्या विरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप विरोधात बंडखोरीबाबत तशी चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सोबत केल्याचा दावा देखील संजय आधारवाडे यांनी केला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सगळं  काही ठिक नसल्याची चर्चा सुरु आहे. आहे का? असा सवाल उपस्थित होतोय.

वाशिम मतदारसंघात भाजप विरूद्ध शिवसेना ठाकरे गटात चुरशीचा सामना 

वाशीम विधानसभा मतदारसंघात यावेळेस भाजप विरूद्ध शिवसेना ठाकरे गटात चुरशीचा सामना होत आहे. भाजपने भाकरी फिरवत चार वेळा आमदार राहिलेल्या लखन मलिक यांची उमेदवारी दिली नाही. त्यांच्याऐवजी श्याम खोडे यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे. त्यामुळे या जागेवर वरिष्ठांचे लक्ष राहणार आहे. पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी कार्यकारिणीत देखील बदल केला. त्याचा परिणाम जातीय समीकरणासह निवडणुकीवर देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे गेल्या निवडणुकीत वंचित आघाडीच्या तिकीटावर दुसऱ्या क्रमांकाची 52 हजार 464 मते घेणारे डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी हातात मशाल घेतली. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून ते रिंगणात आहेत. गेल्या वेळेस अपक्ष लढून 45 हजार 407 मते घेणारे शशिकांत पेंढारकर पुन्हा एकदा अपक्षच निवडणूक रिंगणात आहेत. वाशीममध्ये मविआ व महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. त्यामुळे मतविभाजन होईल. 

2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत काय झालं? 

लखन सहदेव मलिक, भाजप - 66,159 (13,695 मतांनी विजय) 
सिद्धार्थी आकाराम देवळे, वंचित बहुजन  आघाडी - 52 564 

इच्छुकांना तिकीट न मिळाल्यामुळं बंडखोरी

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच पेटल्यांच चित्र पाहायला मिळत आहे. ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षातील इच्छुकांना तिकीट न मिळाल्यामुळं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. यामध्ये अनेकांनी बंडखोरी करण्याचा निर्णय देखील जाहीर केला आहे. ही बंडखोरी महाविकास आघाडीसह महायुतीत देखील आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असा निर्णय अनेक नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळं नेत्यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. दरम्यान, येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 23 तारखेला विधानसभेचा निकाल लागणार आहे. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Rain Update: कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; अनेक मार्गांवर पाणी; कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली
कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; अनेक मार्गांवर पाणी; कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली
BEST Election Result: बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे गटाला अतिआत्मविश्वास नडला? पहिल्याच निवडणुकीत ठाकरे ब्रँडला धक्का
बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे गटाला अतिआत्मविश्वास नडला? पहिल्याच निवडणुकीत ठाकरे ब्रँडला धक्का
Sumeet Raghavan On Poor Road Conditions: 'रस्त्यावरची कुत्री, कबुतरं यांपेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी आहेत देशात...'; गडकरी-फडणवीसांना टॅग करुन मराठमोळ्या अभिनेत्यानं व्यक्त केला संताप
'रस्त्यावरची कुत्री, कबुतरं यांपेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी आहेत देशात...'; गडकरी-फडणवीसांना टॅग करुन मराठमोळ्या अभिनेत्यानं व्यक्त केला संताप
Maharashtra Heavy Rain: मुंबईनंतर पावसाने पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, पंचगंगा धोक्याच्या पातळीला, पंढरपुरात चंद्रभागा नदीचं पाणी शिरलं
मुंबईनंतर पावसाने पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, पंचगंगा धोक्याच्या पातळीला, पंढरपुरात चंद्रभागा नदीचं पाणी शिरलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Rain Update: कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; अनेक मार्गांवर पाणी; कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली
कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; अनेक मार्गांवर पाणी; कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली
BEST Election Result: बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे गटाला अतिआत्मविश्वास नडला? पहिल्याच निवडणुकीत ठाकरे ब्रँडला धक्का
बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे गटाला अतिआत्मविश्वास नडला? पहिल्याच निवडणुकीत ठाकरे ब्रँडला धक्का
Sumeet Raghavan On Poor Road Conditions: 'रस्त्यावरची कुत्री, कबुतरं यांपेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी आहेत देशात...'; गडकरी-फडणवीसांना टॅग करुन मराठमोळ्या अभिनेत्यानं व्यक्त केला संताप
'रस्त्यावरची कुत्री, कबुतरं यांपेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी आहेत देशात...'; गडकरी-फडणवीसांना टॅग करुन मराठमोळ्या अभिनेत्यानं व्यक्त केला संताप
Maharashtra Heavy Rain: मुंबईनंतर पावसाने पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, पंचगंगा धोक्याच्या पातळीला, पंढरपुरात चंद्रभागा नदीचं पाणी शिरलं
मुंबईनंतर पावसाने पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, पंचगंगा धोक्याच्या पातळीला, पंढरपुरात चंद्रभागा नदीचं पाणी शिरलं
BEST Election Result: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचा बेस्ट पतपेढी निवडणुकीत पराभव; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचा बेस्ट पतपेढी निवडणुकीत पराभव; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले...
मोठी बातमी! पावसात भिजलेल्या मुंबईकरांनो 72 तासांत वैद्यकीय सल्ला घ्या; आयुक्तांचे आवाहन, लेप्टोच्या संसर्गाची शक्यता
मोठी बातमी! पावसात भिजलेल्या मुंबईकरांनो 72 तासांत वैद्यकीय सल्ला घ्या; आयुक्तांचे आवाहन, लेप्टोच्या संसर्गाची शक्यता
नाशिकमध्ये दोन मजली इमारत कोसळली, मलाब्याखाली नागरिक अडकले, सहा ते सात जण जखमी 
नाशिकमध्ये दोन मजली इमारत कोसळली, मलाब्याखाली नागरिक अडकले, सहा ते सात जण जखमी 
Stocks to Watch: शेअर बाजारात तेजी सुरु, सेन्सेक्स निफ्टीवर 21 ऑगस्टला 'या' सात स्टॉकवर लक्ष ठेवा, कमाईची संधी 
शेअर बाजारात तेजी सुरु, सेन्सेक्स निफ्टीवर 21 ऑगस्टला 'या' सात स्टॉकवर लक्ष ठेवा, कमाईची संधी 
Embed widget