Uttarakhand Election 2022 : दिवंगत जनरल बिपिन रावत यांचे भाऊ विजय रावत यांचा भाजपमध्ये प्रवेश ; प्रवेशानंतर पंतप्रधानांचे कौतुक
दिवंगत जनरल बिपिन रावत यांचे भाऊ निवृत्त कर्नल विजय रावत यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कर्नल विजय रावत यांना पक्षाचे सदस्यत्व बहाल केले.
Uttarakhand Election 2022 : दिवंगत जनरल बिपिन रावत यांचे लहान भाऊ निवृत्त कर्नल विजय रावत यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कर्नल विजय रावत यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पक्षाचे सदस्यत्व बहाल केले. यावेळी प्रदेश प्रभारी दुष्यंत गौतम, प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक अनिल बलुनी हे उपस्थित होते. भाजप प्रवेशानंतर त्यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. "भाजपमध्ये येण्याची संधी मिळाली याबद्दल मी कृतज्ञ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारसरणी आणि दृष्टी अप्रतिम आहे." अशा भावना विजय रावत यांनी व्यक्त केल्या आहेत.
मैं आभारी हूं कि मुझे भाजपा में शामिल होने का मौका मिला है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की सोच और विजन बहुत अद्भुत है: भाजपा में शामिल होने के बाद दिवंगत CDS जनरल बिपिन रावत के छोटे भाई कर्नल विजय रावत pic.twitter.com/cQckDVd8Bv
— ANI_HindiNews (@AHindinews) January 19, 2022
दरम्यान, विजय रावत यांच्या भाजप प्रवेशाआधी त्यांनी आज सकाळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीवरून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर त्यांच्या भाजप प्रवेशाने या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही आज सकाळी विजय रावत यांची भेट घेतल्याचे ट्विटरवरून सांगितले होते. " जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या कुटुंबाने देशासाठी केलेल्या सेवेला आम्ही सलाम करतो. त्यांच्या स्वप्नासारखा उत्तराखंड बनवण्यासाठी मी नेहमीच काम करेन." असे ट्विट पुष्कर सिंह धामी यांनी विजय रावत यांच्या भेटीनंतर केले होते.
उत्तराखंड विधानसभेची निवडणूक एकाच टप्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार 14 फेब्रुवारी 2022 रोजी उत्तराखंड विधानसभेसाठी मतदान होईल तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकीचा महासंग्राम; आधीचं बलाबल काय? यावेळी हे मुद्दे गाजणार
- Election 2022 Dates : पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर, UP मध्ये 7 टप्प्यात मतदान, 10 मार्चला निकाल
- ABP News C Voter Survey : कोरोना, मोदींचा चेहरा की योगींचं काम....निवडणुकीत कोणता मुद्दा ठरणार प्रभावी, पाहा काय म्हणतेय जनता