एक्स्प्लोर

राजकीय विरोधक म्हणजे देशविरोधी किंवा शत्रू नव्हेत, अडवाणींचा ब्लॉग

भाजपचा स्थापना दिवस म्हणजेच 6 एप्रिलची आठवण करुन देत अडवाणींनी आपण भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनसंघ या दोन्हीचे संस्थापक सदस्य असल्याचं सांगितलं. गेल्या सत्तर वर्षांपासून देशसेवा करत आल्याचंही अडवाणींनी अधोरेखित केलं.

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अखेर आपल्या नाराजीला वाट मोकळी करुन दिली आहे. भाजपने राजकीय विरोधकांना कधीच आपला शत्रू मानलं नाही. राजकीय मुद्द्यांवर ज्यांच्याशी विचार पटत नाहीत, त्यांना देशविरोधी मानलं नसल्याचं अडवाणींनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. LK Advani Blog मध्ये लालकृष्ण अडवाणींनी भाजपमधील सद्य परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 'आधी देश, मग पक्ष आणि अखेरीस स्वतः' असं या ब्लॉगचं शीर्षक आहे. भाजपचा स्थापना दिवस म्हणजेच 6 एप्रिलची आठवण करुन देत अडवाणींनी आपण भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनसंघ या दोन्हीचे संस्थापक सदस्य असल्याचं सांगितलं. गेल्या सत्तर वर्षांपासून देशसेवा करत आल्याचंही अडवाणींनी अधोरेखित केलं. लालकृष्ण अडवाणी हे गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून गेल्या सलग सहा टर्म खासदार राहिले आहेत. इथल्या मतदारांचे अडवाणींनी आभार व्यक्त केले. 'आधी देश, मग पक्ष आणि अखेरीस स्वतः' हा आपल्या आयुष्याचा मूलमंत्र आहे. आपण तो आयुष्यभर पाळत आलो आहोत, असं अडवाणींनी सांगितलं. विविधता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे भारतीय लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. भाजपने राजकीय विरोधकांना कधीच आपला शत्रू मानलं नाही. राजकीय मुद्द्यांवर ज्यांच्याशी विचार पटत नाहीत, त्यांना देशविरोधी मानलं नाही. सत्य, राष्ट्रनिष्ठा आणि लोकशाहीवर माझ्या पक्षाचा विकास झाला, असंही अडवाणी म्हणतात. भाजपने लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यासारख्या दिग्गज नेत्यांचं तिकीट कापलं. वाढत्या वयामुळे अडवाणींना उमेदवारी दिली नसल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं. मुरली मनोहर जोशी यांनी कानपूरमधील मतदारांना पत्र लिहून नाराजी उघड केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget