एक्स्प्लोर
पार्थच्या पराभवाची जबाबदारी सर्वस्वी माझी, पार्थच्या पराभवानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया
मावळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांना पराभवला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे पार्थच्या या पराभवानंतर अजित पवारांची याची जबाबदारी स्वीकारली आहे.

MUMBAI, INDIA - JANUARY 18, 2011: L to R) Dy.Chief Minister of Maharastra Ajit pawar, Chief Minister of Maharastra Prithviraj Chavan and Industry Minister Narayan Rane in the open house discussion on jaitapur nuclear power project at Y.B. Chavan center on Tuesday. (Photo by Vijayanand Gupta/Hindustan Times via Getty Images)
मुंबई : लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या पार्थ पवाराच्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी माझी असल्याची प्रतिक्रिया वडील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी पार्थ पवार यांना दारुण पराभूत केलं आहे.
मावळ मतदारसंघातील जनतेनं दिलेला कौल आपण स्वीकारला आहे. आता सर्वांनी विधानसभेला तयारीला लागण्याचे आदेश देखील अजित पवारांनी दिले आहे. तसेच राज्यात दुष्काळाची समस्या मोठी आहे, त्याचा मुकाबला कसा करायचा याबाबत आम्ही बैठकीत चर्चा केली आहे.
EXCLUSIVE | पार्थ पवार यांच्याशी खास बातचीत | एबीपी माझा
मावळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांना पराभवला सामोरे जावे लागले आहे. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचा तब्बल दोन लाख 15 हजार 913 मतांनी विजय झाला. तर मावळमध्ये पार्थ पवरांना 503375 मते मिळाली आहेत. तर विजयी खासदार बारणे यांना 718950 मते मिळाली आहेत.
पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे मावळ मतदार संघातील लढत राज्यभर चर्चेत होती. अजित पवार यांनी स्वत प्रचारात लक्ष घातले होते. मात्र, पवारांच्या पार्थला राजकीय चक्रव्यूह भेदण्यात अपयश आले आहे. म्हणून अजित पवार यांनी पार्थ पवारच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.
VIDEO | ..म्हणून पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारी : प्रफुल पटेल | तोंडी परीक्षा | एबीपी माझा
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
क्रिकेट
क्रीडा




















