एक्स्प्लोर

राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!

Sharad Pawar Ichalkaranji rally : सांगलीमधील रोहित पाटील यांच्यासाठी सभा पार पडल्यानंतर इचलकरंजीमध्ये शरद पवार मनद कारंडे यांच्या प्रचार सभेसाठी आले असता पावसाने जोरदार हजेरी लावली.

Sharad Pawar Ichalkaranji rally : सातारमध्ये 2019 मध्ये झालेल्या ऐतिहासिक सभेतील पावसाची आठवण करून देणारी सभा आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये झाली. आज इचलकरंजीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या सभेसाठी शरद पवार इचलकरंजीमध्ये पोहोचले. सांगलीमधील रोहित पाटील यांच्यासाठी सभा पार पडल्यानंतर इचलकरंजीमध्ये शरद पवार मनद कारंडे यांच्या प्रचार सभेसाठी आले असता पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा पाऊस आणि शरद पवार असे समीकरण जुळून आले. नेमका हाच धागा पकडत शरद पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. 

भिजत सभा झाली की निवडणुकीचा निकाल चांगला लागतो 

भर पावसातील सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो. शरद पवारांनी जाहीर सभेत असं सांगताच समोरुन एकच जल्लोष झाला. यावेळी समोर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी शिट्ट्या आणि टाळ्यांमध्ये जोरदार प्रतिसाद देत शरद पवार यांच्या सभेला पावसामध्येही जाण आणली. 

महाराष्ट्राचा पाळणा कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय घ्यायचा आहे 

पवार म्हणाले की लोकसभेत निवडणुकीनंतर आता विधानसभेचे निवडणूक होत आहे. त्यामुळे आपण कारभार कोणाच्या हातात द्यायचं हे ठरवायचं आहे. सत्तेत बदल केल्याशिवाय पर्याय आपल्यासमोर दिसत नाही आणि सत्ता बदलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा, यापेक्षा इथे अधिक बोलावसं वाटत नाही, असे ते म्हणाले. पवार यांनी सांगितले की ही विधानसभेची निवडणूक आहे. महाराष्ट्राचा पाळणा कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय घ्यायचा आहे. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे अनुभव काही चांगला नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget