एक्स्प्लोर
Advertisement
पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभेसाठी एसपी कॉलेज मैदानातील झाडांची कत्तल
कापण्यात आलेल्या या झाडांची संख्या इतकी मोठी आहे की तोडलेल्या फांद्या आणि पालापाचोळा उचलून नेण्यासाठी काही ट्रकची गरज लागली.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेसाठी एस पी कॉलेजच्या मैदानावरच्या मोठमोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. 17 ऑक्टोबरला म्हणजे गुरुवारी होणाऱ्या या सभेची तयारी करताना, ज्या झाडांचा अडथळा वाटेल ती सगळी झाडं मशीनच्या साहाय्याने कापण्यात आली आहेत. कापण्यात आलेल्या या झाडांची संख्या इतकी मोठी आहे की तोडलेल्या फांद्या आणि पालापाचोळा उचलून नेण्यासाठी काही ट्रकची गरज लागली.
एसपी कॉलेज ज्या शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेकडून चालवलं जातं, त्या संस्थेवर भाजपच्या नेत्यांचच वर्चस्व आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही झाडं तोडण्यात आली असून ती तोडण्याची परवानगी घेतली होती, असा दावा सभेच्या आयोजकांकडून करण्यात आलं आहे. पण एकीकडे कोट्यवधी वृक्षांची लागवड केल्याचा दावा करणारे भाजप नेते झाडांबाबत किती संवेदनशील आहेत हेच यातून दिसून येत आहे.
त्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कालच्या (14 ऑक्टोबर) उस्मानाबादमधील सभेसाठी जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत दोन ठिकाणी तोडण्यात आली होती. शिवाय शाळेत परीक्षा सुरु होती. परंतु सभेसाठी ही परीक्षाही लांबणीवर पडली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement