Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उमेदवारांचा उच्चांक; सरासरीच्या तुलनेत तिप्पट वाढ
राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या संख्येने यंदा उच्चांक गाठला आहे. राज्यात आजवर झालेल्या तेरा विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारांच्या सरासरीच्या तुलनेत तिप्पट उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहे.
![Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उमेदवारांचा उच्चांक; सरासरीच्या तुलनेत तिप्पट वाढ High number of candidates in assembly election field Three times the average over maharashtra assembly election 2024 total 7995 candidates file 10905 nominations for election check details Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उमेदवारांचा उच्चांक; सरासरीच्या तुलनेत तिप्पट वाढ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/30/451ff667059a67a52ac1ef29c33631491730264727729892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या संख्येने यंदा उच्चांक गाठला आहे. राज्यात आजवर झालेल्या तेरा विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारांच्या सरासरीच्या तुलनेत तिप्पट उमेदवार यंदा निवडणुकीच्या मैदानात आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर राज्यात 288 मतदार संघात 7 हजार 995 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दरम्यान, आजवर झालेल्या 13 विधानसभा निवडणुकांमध्ये सरासरीने 2 हजार 581 उमेदवार उभे राहायचे. मात्र आजवरच्या तेरा निवडणुकांमध्ये सर्वाधिक 4 हजार 727 उमेदवार 1995 मध्ये उभे होते. तर 2014 मध्ये 4 हजार 407 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. यंदा मात्र आजवरच्या 13 विधानसभा निवडणुकीच्या सरासरीच्या तुलनेत तिप्पट पेक्षा जास्त म्हणजेच 7 हजार 995 उमेदवार उभे राहिले आहे. त्यामुळे यावेळेची निवडणूक अधिक चुरशीची होणार असून नेमकं कोणाचे वर्चस्व राज्यात असणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
7995 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगानं 15 ऑक्टोबर रोजी केली होती. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एका टप्प्यात पार पडत आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. या 288 मतदारसंघासाठी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 23 नोव्हेबंर ते 29 नोव्हेबंर पर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर उमदेवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमदेवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक आयोगानं माहिती दिली आहे. त्यानुसार 7995 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात असून त्यांनी 10905 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमुळे पक्षांची संख्या वाढताना इच्छुक उमेदवार आणि बंडखोरांची संख्या ही कमालीची वाढली आहे, हेच यातून दिसून येत आहे. आता तिपटीने वाढलेल्या उमेदवारांपैकी बंडखोरांना बसवणे, वोट कापणाऱ्या उमेदवारांना शांत करणे, हे राज्यातील दोन्ही प्रमुख पक्षांसमोरचा सर्वात मोठा आव्हान राहणार आहे.
4 नोव्हेंबरला चित्र स्पष्ट होणार
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं चित्र 4 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. कारण, उमेदवारी अर्ज मागं घेण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नावं स्पष्ट होतील.
प्रचाराचा जोर वाढणार
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराला जोर वाढू शकतो. सर्वच राजकीय पक्ष दिवाळीनंतर प्रचाराचा धडाका उडवू शकतात. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, माकप, महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, युवा स्वाभिमान पार्टी,जनसुराज्य शक्ती पार्टी हे रिंगणात आहेत. या शिवाय मनसे, वंचित बहुजन आघाडी, परिवर्तन महाशक्ती यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यात विधानसभेसाठी मतदान 20 नोव्हेंबरला होत असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)