एक्स्प्लोर

Election 2022 : निकाल राज्यांचा, परिणाम राष्ट्रीय राजकारणावर होणार?

Election 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा आजचा निकाल राष्ट्रीय राजकारणावरही बराच परिणाम करणारा ठरणार आहे.

Election Result 2022 :  आजची निवडणूक राज्यांची असली तरी राष्ट्रीय राजकारणावर परिणाम टाकणारे निकाल मतदानात उमटले आहेत. एकतर 2024 च्या दृष्टीनं भाजपचे दावा या विजयानं मजबूत झाले, पण राष्ट्रपती निवडणुकीची वाटही भाजपसाठी सोपी झाली. शिवाय आपच्या पंजाब विजयानं राष्ट्रीय राजकारणात तिसरा कोनही तयार होत असल्याचं दिसतंय.  उत्तर प्रदेशचं राष्ट्रीय राजकारणातलं महत्व नव्यानं सांगण्याची गरज नाही. तब्बल 80 खासदार एकट्या राज्यातून निवडून येतात आणि असं राज्य भाजपनं सलग दुस-यांदा बहुमतानं जिंकलंय. त्यामुळे 2024 साठी भाजपचे हात आणखी मजबूत झालेत शिवाय जुलै महिन्यात होणा-या राष्ट्रपती निवडणुकीची वाटही सोपी झाल्याचं दिसतंय. 

  • राष्ट्रपती निवडणुकीत एकूण 10 लाख 98 हजार 903 मतं असतील.
  • जिंकण्यासाठी मॅजिक आकडा 5 लाख 49 हजार 452
  • भाजपकडे सध्या 4 लाख 74 हजार 102 मतं आहेत असं जाणकार सांगतात.

आजच्या निकालानं दिसतंय की, भाजपच्या ताकदीत फारशी घट झालेली नाहीय. फक्त कमी पडणा-या मतांसाठी त्यांना काही मित्रांची गरज लागेल. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आमदार खासदारांना मतदान करता येतं आणि त्या त्या राज्यातील लोकसंख्या आणि पक्षीय बलाबलानुसार त्यांच्या एका मताची किंमत ठरलेली असते. उत्तरप्रदेशच्या आमदार खासदाराच्या मताला सर्वात जास्त मूल्य असते. आणि जागा कमी झाल्या तरी इथलं प्राबल्य भाजपनं राखलेलं आहे.  शिवाय राष्ट्रीय राजकारणात आता काँग्रेसला आपच्या रुपानं सक्षम पर्यायही समोर येताना दिसतोय. 

देशाच्या कानाकोप-यात अनेक प्रादेशिक पक्ष आपलं बस्तान बसवून असले तरी राष्ट्रीय राजकारणात मात्र काँग्रेस आणि भाजप हे दोनच ध्रुव दिसतात. आपच्या पंजाब विजयानं आता  आणखी एक कोन राष्ट्रीय राजकारणात शिरकाव करताना दिसतोय. गुजरात, हिमाचल, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश हे असे राज्य आहेत जिथे थेट भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होते. आता या लढाईत आपचीही एन्ट्री झाल्यानं काँग्रेसला कुठे कुठे फटका बसतो हे पाहावं लागेल. त्याची पहिली झलक येत्या वर्षाअखेरीस होणा-या गुजरातच्या निवडणुकीतच कळेल. 

या ठिकाणी पाहा लाईव्ह निकालाचे अपडेट्स 

https://marathi.abplive.com/live-tv 

https://twitter.com/abpmajhatv 

https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA 

संबंधित बातम्या

Share Market : पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकाला दिवशी सेन्सेक्स 1000ने वधारला, निफ्टी देखील 321 अंकांनी वर

Goa Election Result : गोव्यात चुरस वाढली! सुरुवातीचे सर्व कल हाती; काँग्रेस-भाजपमध्ये घासून सामना, उत्पल पर्रीकर पिछाडीवर

Election Result 2022 : सुरुवातीच्या कलांमध्ये यूपी, उत्तराखंडमध्ये भाजप, पंजाबमध्ये आप आघाडीवर तर गोव्यात घासून!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणारAnant Kalse on Shivsena : ठाकरे गट पुन्हा फुटला तर काय होईल? शिंदे गटात विलीन की स्वतंत्र पक्ष?Mahadev Munde Death Story : महादेव मुंडेंच्या मृत्यूची कहाणी पत्नी आणि मेव्हण्याने A टू Z सांगितली..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
Embed widget