(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde : मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला, पण एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे गृहखातं मागितलं, सूत्रांची माहिती
Eknath Shinde, मुंबई : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा सोडला. मात्र, गृहखात्याची मागणी केली आहे, याबाबतची माहिती सूत्रांनी दिलीये.
Eknath Shinde, मुंबई : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडून भाजपचा मार्ग मोकळा केला. पण त्याबदल्यात त्यांनी दिल्लीतल्या भेटीत अमित शाहांसमोर (Amit Shah) मोठ्या मागण्या केल्याची माहिती आहे. त्यातली सर्वात मोठी मागणी म्हणजे शिंदेंना शिवसेनेसाठी (Shivsena Eknath Shinde) सरकारमधलं अतिशय महत्त्वाचं असणारं गृहखातं हवं आहे. सोबतच नगरविकास खात्यासह अनेक मागण्या शिंदेंनी अमित शाहांपुढे ठेवल्यात. आता या मागण्या भाजप हायकमांड पूर्ण करणार का हा प्रश्न आहे.
कालच्या दिल्लीतल्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्याकडे कोणत्या मागण्या केल्यात ते पाहुयात...
शिंदेंच्या अमित शाहांकडे कोणत्या मागण्या?
नव्या मंत्रिमंडळात गृहखात्याची मागणी
नगरविकास खात्याची मागणी
शिवसेनेला 12 मंत्रिपदं देण्याची मागणी
विधान परिषद सभापती पदाची मागणी
पालकमंत्रिपद देताना शिवसेनेचा योग्य सन्मान राखावा
महायुती म्हणून शिवसेना सोबतच असल्याचा दिला विश्वास
पण उपमुख्यमंत्रिपदाबाबत बैठकीत कोणताही निर्णय नाही
दिल्लीत अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये बैठक
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुरुवारी (दि.28) एक महत्त्वाची बैठक पार पडली. महायुतीची बैठक होण्याच्या आधी, शाह यांनी शिंदे यांना भेटायला बोलावले होते. अमित शाह आणि एकनाथ शिंदे हे दोनच नेत या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर अमित शाह यांनी जे पी नड्डा यांना बोलावले. शाह, शिंदे आणि नड्डा अशी एक दुसरी बैठक त्यानंतर झाली. तब्बल अर्धा ते पाऊण तास या तिघांची बैठक होती. त्यानंतर फडणवीस आणि पवार यांना फोन करून बैठकीसाठी निरोप देण्यात आला. मात्र आधी झालेल्या बैठकीत शाह आणि शिंदे यांच्यात कोणती चर्चा झाली ही माहिती गुलदस्त्यात आहे.
राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आझाद मैदानात पार पडणार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकतर्फी विजय मिळवला. 288 पैकी 236 जागा मिळवत महायुतीने राज्यातील राजकारणात वर्चस्व मिळवलंय. महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, महायुतीकडे 236 जागा असल्या तरी अद्याप मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय झालेला नाही. मात्र, महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर पार पडणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या