Sangli Vidhan Sabha : बंडखोरांना रोखण्यासाठी फडणवीसांनी सांगलीत थेट चार्टर फ्लाईट पाठवलं, तरीही यश नाहीच! चर्चेचा प्रस्ताव धुडकावला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगलीमधील बंडखोरांना रोखण्यासाठी थेट चार्जर फ्लाईट पाठवून दिलं होतं. मात्र, चार्टर फ्लाईटमध्ये बसण्यासाठी शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी स्पष्ट नकार दिला.
Sangli Vidhan Sabha : महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीला राज्यात बंडखोरीचे ग्रहण मोठ्या प्रमाणावर लागलं आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवारांना कोणताही धोका पोहोचू नये यासाठी दोन्ही आघाड्यांमधून बंडखोरांना शांत करण्यासाठी सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगलीमधील बंडखोरांना रोखण्यासाठी थेट चार्जर फ्लाईट पाठवून दिलं होतं. मात्र, चार्टर फ्लाईटमध्ये बसण्यासाठी शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी स्पष्ट नकार दिला. दुसरीकडे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आज चंद्रकांत पाटील सुद्धा जतमध्ये तमनगौडा रवी पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचणार आहेत. सांगलीमधील सर्वच जागांसाठी भाजपकडून बंडखोरांना रोखण्यासाठी ताकद लावली आहे. कोणत्याही परिस्थितीत बंडखोरांना शांत करण्यासाठी पावली उचलली जात आहेत.
शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे आणि तमनगौडा रवी पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे आणि तमनगौडा रवी पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा ठाम पवित्रा घेतला आहे. सांगली विधानसभेला भाजपमधून शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी बंडखोरी केली आहे. जत विधानसभेला तमनगौडा रवी पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी चर्चेचा प्रस्ताव धडकावला आहे. दुसरीकडे शिराळा विधानसभा मतदारसंघांमध्येही बंडखोरी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काल (31 ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सम्राट महाडिक यांच्याशी वर्षा निवासस्थानी चर्चा केली. शिराळामधून भाजपकडून सत्यजित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, सम्राट महाडिक यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल घेतला आहे. दुसरीकडे महाडिक गटाकडून आज अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
फडणवीसांच्या भेटीनंतर सम्राट महाडिक काय म्हणाले?
सम्राट महाडिक यांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाडिक यांनी व्हिडीओ शेअर करुन माहिती दिली. महाडिक म्हणाले की, अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला खासगी विमानाने बोलावून घेतले. अर्ज माघारीसाठी आणि मनधरणीसाठी चांगली चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या