Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तासगाव कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांच्या विरोधात आणखी तीन रोहित पाटील रिंगणात!
Tasgaon-Kavathe Mahankal : तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित आर आर पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विरोधात माजी खासदार संजय पाटील आहेत.
![Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तासगाव कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांच्या विरोधात आणखी तीन रोहित पाटील रिंगणात! Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Three more Rohit Pati in the arena against Rohit Patil in Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तासगाव कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांच्या विरोधात आणखी तीन रोहित पाटील रिंगणात!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/31/0e625209b0add80ee38a20d840df18361730367561983736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाशी समानता असलेल्या पिपाणी चिन्हाने आणि नाव एकच असलेल्या अनेक उमदेवारांना पक्षाच्या उमेदवारांना तगडा झटका दिला होता. आता तसाच काहीच प्रकार विधानसभा निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळणार का? अशी चर्चा रंगली आहे.
रोहित पाटलांच्या विरोधात तीन रोहित पाटील!
तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित आर आर पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपमधून अजित पवार गटामध्ये आलेल्या माजी खासदार संजय पाटील आहेत. मात्र, रोहित पाटील यांच्या विरोधात रोहित पाटील नावाचे तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे एक नाव असलेले चार रोहित पाटील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. मात्र, रोहित रावसाहेब पाटील आणि संजय काका पाटील यांच्यामध्येच खरी लढत होणार आहे.
दरम्यान, नावात समानता असलेले उमेदवार दिल्यानंतर खासदार विशाल पाटील यांनी टोला हाणला आहे. ते म्हणाले की राहुल पाटील यांना निवडणुकीमध्ये पाडण्यासाठी खूप प्रयत्न होणार आहेत. आर आर आबा सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात असताना आर आर पाटील नावाचे चार चार उमेदवार निवडणुकीमध्ये असायचे. पूर्वी एखादा माणूस चुकत होता. मात्र आता मतपेटीवर फोटो येणार आहे. त्यामुळे रोहित पाटील यांची छबी दिसणाऱ्या पुढे बटन दाबून मतदान करतील असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)