(Source: Poll of Polls)
निवडणुकांची रणधुमाळी संपताच देवेंद्र फडणवीस तडकाफडकी सरसंघचालकांच्या भेटीला; डॉ. मोहन भागवत यांच्याशी राजकीय खलबतं?
Devendra Fadnavis : निवडणुकांची रणधुमाळी संपताच नागपुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी संघ मुख्यालयाला भेट दिल्याची माहिती आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: संपूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागून राहिलेला विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळीची अखेर आज सांगता झाली आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठीचे आज (बुधवारी) मतदान पार पडले असून मतदारांचा अंतिम कौल मतपेटीत कैद झाला आहे. तर येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर राज्याच्या सत्तेच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ही मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (Exit Polls) निकाल जाहीर झाले आहेत. यामधून यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, याबद्दल संकेत मिळत आहेत. (Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024) विविध संस्थांच्या या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार यंदा नागपूर, विदर्भासह राज्यात कोण बाजी महाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
देवेंद्र फडणवीस तडकाफडकी सरसंघचालकांच्या भेटीला
निवडणुकांची रणधुमाळी संपताच नागपुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी संघ मुख्यालयाला भेट दिल्याची माहिती आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी पंधरा मिनिटे चर्चा केल्याचीही माहिती पुढे आली आहे. दरम्यान, राज्याच्या मतदारांचा कौल मतपेटीत कैद झाल्यानंतर तडकाफडकी घेतलेल्या या भेटीमुळे एक वेगळं महत्व प्राप्त झाले आहे.
सुमारे 15 ते 20 मिनिट चर्चा, राजकीय वर्तुळात तर्क वितर्क
देवेंद्र फडणवीस यांनी आज मतदान केल्यानंतर दिवसभर नागपुरातील वेगवेगळ्या बूथ वर जाऊन भाजप कार्यकर्त्यांची भेट घेत होते. संध्याकाळी मतदान पूर्ण झाल्यानंतर फडणवीस अचानक संघ मुख्यालयात पोहोचले आणि त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. सुमारे 15 ते 20 मिनिट फडणवीस संघ मुख्यालयात होते. त्यामुळे या भेटीमागील कारण अद्याप कळू शकले नसले तरी या भेटीमुळे अनेक तर्क वितर्क राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहे.
हे ही वाचा