एक्स्प्लोर
'ड्रीमगर्ल'ला डान्सिंग स्टारची टक्कर, हेमामालिनींविरोधात सपना चौधरी लोकसभेच्या रिंगणात?
उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान खासदार हेमा मालिनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेस हरियाणाची डान्सर सपना चौधरीला तिकीट देण्याची शक्यता आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात 'फिल्मी फाईट' रंगण्याची शक्यता आहे. 'ड्रीमगर्ल' अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याविरोधात हरियाणाची डान्सर सपना चौधरी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. काँग्रेस सपना चौधरीला लोकसभेचं तिकीट देण्याची चिन्हं आहेत.
आधी करिना कपूर, त्यानंतर सलमान खान... काँग्रेसच्या तिकीटावर बॉलिवूडचे सेलिब्रेटी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चा काही काळापासून रंगत होत्या. यथावकाश दोघांनीही या अफवा असल्याचं स्पष्टीकरण दिलं आणि चर्चेचा धुरळा खाली बसला. आता नाव चर्चेत आहे ते सपना चौधरीचं.
उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान खासदार हेमा मालिनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. भाजपच्या जागा खेचून आणण्यासाठी काँग्रेस जंग जंग पछाडताना दिसत आहे. त्यामुळेच हेमा मालिनी यांच्यासमोर तुल्यबळ प्रतिस्पर्धी देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल.
सपना चौधरी 'बिग बॉस'च्या अकराव्या पर्वात सहभागी झाली होती. त्यामुळे हरियाणाची डान्सर असूनही सपना चौधरीचे चाहते सर्वत्र आहेत. नुकतंच तिने एका बॉलिवूडपटातही भूमिका केली होती.
सपनाच्या वडिलांचं तिच्या बाराव्या वर्षी निधन झालं. त्यानंतर भाऊ आणि आईची जबाबदारी तिच्यावर पडली. सपनाने गायन आणि नृत्यातच आपलं करिअर केलं.
हेमा मालिनी यांची चित्रपट कारकीर्द चांगलीच गाजली आहे. 2003 साली त्या राज्यसभेवर खासदार झाल्या. तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी हेमा मालिनी यांची नियुक्ती केली होती. 2004 साली त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला.
हेमा 2014 साली मथुरेतून लोकसभेच्या रिंगणात उतरल्या. रालोदचे उमेदवार जयंत चौधरी यांचा त्यांनी तीन लाख 30 हजार 743 मतांनी पराभव केला.
सपना अवघ्या 28 वर्षांची आहे, तर हेमा मालिनी सत्तरीच्या. सपनाच्या वयापेक्षाही हेमा मालिनींची चित्रपट कारकीर्द दीर्घ आहे. त्यामुळे भरतनाट्यम विरुद्ध हरियाणवी डान्सची लढत रंगतदार होईल, यात शंका नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement