मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, लोकसभा आणि विधानसभा मात्र महाविकास आघाडीतून लढवण्याचा निर्णय; सूत्रांची माहिती
मुंबई महानगरपालिका निवडणुका लागल्या तर सर्वात एक नंबरला शिवसेना ठाकरे गट असेल आणि दोन नंबरला काँग्रेस असेल असं काँग्रेसच्या सर्वेक्षणातून समोर आल्याची माहिती आहे.
![मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, लोकसभा आणि विधानसभा मात्र महाविकास आघाडीतून लढवण्याचा निर्णय; सूत्रांची माहिती Congress will fight bmc election Mumbai Municipal Corporation independant Lok Sabha and Vidhan Sabha from Mahavikas Aghadi मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, लोकसभा आणि विधानसभा मात्र महाविकास आघाडीतून लढवण्याचा निर्णय; सूत्रांची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/15/5e9886d324b4037f68fec455e170f8751684141169411211_original.avif?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
BMC Election : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचे मनोबल वाढलय. महाराष्ट्रात महाविकास आघाडी असली तरी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसने तयारी सुरू केलीय. तर विधानसभा आणि लोकसभा महाविकास आघाडीत एकत्र लढणार असल्याची माहिती आहे. कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्रातही आता आपली सत्ता येऊ शकते या आशेने काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कामाला लागलेत.
राज्यात जरी महाविकास आघाडी असली तरी आगामी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार असल्याची तयारी काँग्रेसने सुरू केलीय. काँग्रेस पक्षाने मुंबईत एक सर्वेक्षणही केलेला आहे. सर्वेक्षणामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुका लागल्या तर सर्वात एक नंबरला शिवसेना ठाकरे गट असेल आणि दोन नंबरला काँग्रेस असेल आणि त्यानंतर भाजप आणि शिंदे गट असेल असा दावा काँग्रेसचे नेते करू लागलेले आहेत.
सर्वेक्षणात जरी शिवसेना ठाकरे गट जर एक नंबरला असेल आणि दोन नंबरला काँग्रेस असेल तरी काँग्रेसचा पारंपारिक मुंबईतला मतदार हा दलित मुस्लिम आणि सर्वसामान्य राहिलेला आहे. त्यामुळे जर एकत्रित निवडणुका लढल्या तर काँग्रेसच्या हा मतदार ठाकरे गटाकडे सरकण्याची भीती काँग्रेसला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत एकत्र लढण्याऐवजी 'एकला चलो रे' अशी भूमिका घेणे पसंत करत आहे.
कशी आहे मुंबईतील जातीनिहाय मतांची टक्केवारी?
- मुंबईत 31 टक्के मराठी मतं आहेत.
- मुंबईत 26 टक्के उत्तर भारतीय मतदार.
- 13 टक्के गुजराती मतदार.
- 13 टक्के मुस्लिम मतदार आहेत.
- 14 टक्के दलित मतदार आहेत. त्यापैकी 9 टक्के बौद्ध आहेत.
ही आकडेवारी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात बरंच काही सांगू पाहते. युती-आघाडीच्या मतदारांपैकी यावेळी युतीमधील अनेक मतं विभागली जाणार आहेत. भाजपा, शिवसेना, शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात मोठ्या प्रमाणात विभागणी होऊ शकते. मात्र काँग्रेसच्या पूर्वीच्या मतदारांची आकडेवारी पाहिली तर ती मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळत आहे. त्यामुळे काँग्रेस स्वबळावर लढण्यासाठी फायदा होऊ शकतो असा नेत्यांचा अंदाज आहे.
मुंबई महापालिकेच्या मागील तीन निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाला किती मतदान झालं?
2007 मुंबई महापालिका निवडणूक
- भाजप 8.86 टक्के मतदान
- शिवसेना 22.15 टक्के मतदान
- काँग्रेस 27.58 टक्के मतदान
- राष्ट्रवादी 11.22 टक्के मतदान
- मनसे 11.78 टक्के मतदान
2012 मुंबई महापालिका निवडणूक मतदान
- भाजप 8.7 टक्के मतदान
- शिवसेना 20.81 टक्के मतदान
- काँग्रेस 19.89 टक्के मतदान
- राष्ट्रवादी 7.28 टक्के मतदान
- मनसे 20.62 टक्के मतदान
2017 मुंबई महानगरपालिका मतदान
- भाजप 27.48 टक्के मतदान
- शिवसेना 28.34 टक्के मतदान
- काँग्रेस 15.97 टक्के मतदान
- राष्ट्रवादी 4.85 टक्के मतदान
- मनसे 7.97 टक्केमतदान
2017ची मुंबई महानगरपालिका सोडली तर मागील दोन निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्या मतांमध्ये फारसा फरक पाहायला मिळत नाही. काहीच मतांनी काँग्रेसच्या अनेक उमेदवारांचा पराभव झालेला आहे. त्यामुळे साहजिकच आहे जर तत्कालीन युतीच्या मतांमध्ये अशा प्रकारची विभागणी झाली तर त्याचा काँग्रेसला एक हाती फायदा होईल.
त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा जरी महाविकास आघाडीत एकत्रित लढत असले तरी मुंबई महानगरपालिका काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत आहे. जर त्यावेळी भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवून नंतर एकत्र येत असेल तर त्याच स्वरूपाची स्टॅटेजी आता मुंबई महानगरपालिकेत महाविकास आघाडी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)